prabodhini news logo
Home आरोग्य शिवणी येथे मोफत नेत्ररोग तपासणी व चष्मेवाटप शिबिर संपन्न

शिवणी येथे मोफत नेत्ररोग तपासणी व चष्मेवाटप शिबिर संपन्न

0
132

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा पुढाकार

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा या उदांत हेतूने गेल्या अनेक वर्षांपासून मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार यांच्या संकल्पनेतून तालुका काँग्रेस कमिटी सिंदेवाही च्या वतीने तालुक्यातील शिवणी येथे नुकतेच मोफत नेत्ररोग तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी सिंदेवाही तालुका काँग्रेसचे कार्यकर्ते सुधीर चन्ने, संतोष हेडाऊ, किशोर गुरणुले, परमानंद गाहाने, दामोधर रामटेके, राहुल आंबोरकर , उमेश चौधरी, राजू बोरकर, नामदेव दडमल, अतुल गायकवाड, मनोहर गजभे, रोशन गभने व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तथा शिवणी ग्रामस्थ, व शिबिर लाभार्थी रुग्ण प्रामुख्याने शिबिराच्या उद्घाटन समारंभास उपस्थित होते.

शिवणी येथे आयोजित सदर शिबिरादरम्यान परिसरातील गावातील एकूण ८०० रुग्णांनी या नेतृत्व शिबिराचा लाभ घेतला. तपासणी अंती सर्व रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तर इतर संभाव्य नेत्ररोगींना नेत्रासंबंधी विकाराचे औषध उपचार मोफत रित्या देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या उदांत हेतूने राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या पुढाकारातून तसेच तालुका काँग्रेस कमिटी सिंदेवाही च्यावतीने विविध आरोग्य शिबिरे आयोजित करून जनसामान्यांपर्यंत याचा लाभ पोहोचविला. अशा विविध शिबिरातून आजवर हजारोंच्या संख्येने नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळाला असून यात नागरिकांच्या विविध शस्त्रक्रिया, कर्करोग निदान व उपचार, नेत्ररोग तपासणी व मोफत चष्मे वाटप, रक्तदान शिबिरे यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here