राज्यातील पहिला प्रयोग – सावली येथे मार्गदर्शन शिबिर
सावली प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ मिळवणे हेतू अनेक ग्राम खेड्यातील नागरिकांना सतत तालुका स्तरावरील कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागते. नागरिकांची ही पायपीट थांबावी याकरिता राज्याची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात राज्यातील पहिला प्रयोग म्हणून आपल्या विशेष संकल्पनेतून विजयदुतांची नियुक्ती केली. हा विजय दूत प्रशासन व सर्वसामान्य नागरिक यांच्यातील दुवा ठरणार असून यामुळे शासन योजनांचा लाभ सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचणार आहे. याबाबत नुकतीच सावली येथे विजयदूत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजित मार्गदर्शन व कार्यकर्ते मेळावा प्रसंगी प्रामुख्याने राज्याची विरोधी पक्षनेते त्याचा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार, माजी जि. प. सभापती दिनेश चिटनुरवार, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नितीन गोहणे ,माजी अध्यक्ष राजेश सिद्धम, महिला तालुका अध्यक्षा उषा भोयर ,नगराध्यक्ष लता लाकडे ,उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपवार ,शहराध्यक्ष विजय मुत्यालवार, माजी प.स.सभापती विजय कोरेवार महिला शहर अध्यक्षा भारती चौधरी ,सरपंच संघटना अध्यक्ष पुरुषोत्तम चुदरी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शनपर बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ग्रामीण भागातील विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी तालुकास्तरावरील तसेच अन्य कार्यालयीन कामकाजासाठी विविध विभागाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत असतात. मात्र वारंवार अधिकाऱ्यांची भेट न झाल्यामुळे आर्थिक भुर्दंड व नाहक हेलपाट्यांमुळे अनेक नागरिक जनकल्याणकारी योजनांपासून वंचित राहतात. या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा तसेच त्यांची पायपीट थांबावी व नागरिकांना एक जनसेवक लोकप्रतिनिधि म्हणून सेवा द्यावी या उदांत हेतूने आपण राज्यात पहिला प्रयोग म्हणून विजय दूध यांची नियुक्ती केली असून नियुक्ती करण्यात आलेला हा विजय दूत प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा ठरणार आहे. विजयदुतांनी कर्तव्यप्रती आपली प्रामाणिकता व तळमळ कायम ठेवून नागरिकांच्या नियमान्वये अत्यावश्यक प्रत्येक कामकाजाला हातभार लावावा. गावोगावी नागरिकांमध्ये शासन योजनांची जनजागृती करून त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत गरजा व समस्या लक्षात घेता माझ्या रूपानेच हा विजय दूत आपल्या दारी पोहोचेल व आपल्या समस्या सर्व मार्गी लावण्याचे कार्य करेल असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. यानंतर उपस्थित नियुक्त विजयदुतांना त्यांच्या कार्याबाबत माहिती देत मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच बूथ कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण गेडाम प्रास्ताविक काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष नितीन गोहने यांनी केले. यावेळी तालुक्यातील बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी ,महिला पदाधिकारी तथा सावली नगरपंचायत चे नगरसेवक व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

