कचरू मानकर
विशेष तालुका प्रतिंनिधी,
गोंडपिपरी
गोंडपिपरी-दि. २०/०२/२०२४, मंगळवारला अखिल भारतीय मादगी समाज संघटना (म.रा.) शाखा – गोंडपिपरी व पोंभुर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीच्या मंगलपर्वावर आयोजित तृतीय भव्य राज्यस्तरीय मादगी समाज परीषद तथा संघटनेचा सातवा वर्धापन दिन व शिवजयंती सोहळा नुकताच पार पडला.
महामानवांच्या प्रेरणादायी प्रतीमेच्या अभिवादनाने कार्यक्रर्माची सुरवात करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचारमंचावर उपस्थित कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक तथा अध्यक्ष मा. मोहन देवतळे, मुंबई अध्यक्ष-संस्थापक अखिल भारतीय मादगी समाज संघटना म.रा., उद्घाटक मा.देवराव भोंगळे माजी.अध्यक्ष जि.प.चंद्रपूर, मा. डॉ. राकेश गावतूरे सामाजिक कार्यकर्ते,चंद्रपूर, सहउद्घाटक मा.अमर बोडलावार माजी जि. प.चंद्रपूर
दिपप्रज्वलन मा.पौरकार संचालक कृ.उ.बाजार समिती, गोंडपिपरी, स्वागताध्यक्ष मा.माया संड्रावार प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष अ.भा. मा.समाज संघटना म.रा., मा.रुपचंद लाटेलवार प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय मादगी समाज संघटन म.रा., प्रमुख मार्गदर्शक मा.डॉ.शाम अहीवले साहीत्यिक पुणे, मा.शेखर दहिवले, गोंडपिपरी, मा.हिरालाल भडके सर विषमता निर्मूलन दल, मा.राजू झाडे, गोंडपिपरी, मा. डॉ.समीर कदम प्रबोधकार,चंद्रपूर, मा.मोतीराम झाडे, मा.रोशन येमुलवार, मा.अशोक नुतपल्लिवार, मा.संगीता बोरकर बांबोळे मॅडम, मा.प्रफुल मग्गीडवार, मा.दिगांबर लाटेलवार यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान गुणांची व कार्याची दखल घेऊन संघटनेने समाजरत्न पुरस्कार-२०२४,
समाजभूषण पुरस्कार -२०२४, समाज गौरव पुरस्कार- २०२४ सत्कार मुर्तिकरिता जाहीर केले.
त्यात समाजरत्न पुरस्कारा करिता कु.सेजल कालिदास लाटेलवार, कु.श्रुती राजेश्वर पवार ,कु.सुजा खोब्रागडे,कु.विशाखा म्हैत्रे, कु.प्रणाली आसमपेल्ली, कु.आशिष खोब्रागडे तसेच समाज-गौरव पुस्करकरिता, मा. संगीता बोरकर – बांबोळे, मा.सुरेश कोमावार,पत्रकार, मा.अनिल बोटकावार सामाजिक कार्यकर्ते, मा.बाबुराव चंद्रगिरीवार, मा.जानकीराम इटकलवार व समाजभूषण पुरस्कार -२०२४ करिता मा. डॉ. शाम अहीवले सर साहीत्यिक,पुणे.
यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, फकिरा कादंबरी देऊन गौरविण्यात आले.
सोबतच यवतमाळ जिल्हात्यातील कार्यकारिनी गठित करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये मा.चंद्रहास इटकलवार सर, मा.गोंविदा कामरेवार सर, मा.पायल देवतळे, मा.संगिता देवतळे, व गोंडपिपरी कार्यकारिणी तसेच मा.रोशन येमूलवार सर, मा.भुषण ईप्पलवार सर, मा . आकाश देठे, मा. संदीप ईटेकार, तसेच पोंभूर्णा कार्यकर्ते तसेच मा.बंडू मोहूर्ले, मा.अजय मोहुर्ले, मा.ज्योती आसामपल्लीवार, मा.किशोर पगडपल्लिवार, मा.स्वप्नील पगडपल्लिवार, मा.कालीदास लाटेलवार मा.विनोद देवगडे सर आदी खूप मोठ्या प्रमाणात समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.रोशन येमुलवार प्रदेशसचिव यांनी केले. संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन मा.जिल्हाध्यक्ष अनिल बोटकावार यांनी केले. तर संपूर्ण सूत्रसंचालन गजू आलेवार यांनी केले तर आभारप्रदर्शन चंद्रहास इटकलवार यांनी मानले.

