prabodhini news logo
Home अमरावती राष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेत कु. गारवी रवी काळमेघ हिचा प्रथम क्रमांक

राष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेत कु. गारवी रवी काळमेघ हिचा प्रथम क्रमांक

0
92

अमरावती प्रतिंनिधी
प्रबोधिनी न्युज

ॲबॅकस मुलांना Basic पासून तर Advance पर्यंत प्रत्येक लेव्हल लहान मुलांची आकलनशक्ती आणि गणिताचा वेग वाढविणे यासाठी ॲबॅकस स्पर्धा घेतली जाते. यामुळे विद्यार्थी कॅल्क्युलेटरच्या स्पीड ने गणित सोडवितात. आणि गणितात आवड निर्माण होवून पुढे गणित तज्ञ व्हावेत म्हणून ‘लिटल जिनिअस नॅशनल लेव्हल ओपन ॲबॅकस कॉम्पीटिशन 2024’ जानेवारीत परीक्षा नुकतीच पार पडली. यामध्ये नामांकित स्कुल नगर परिषद , दुर्गानगर, मोर्शी येथील इयत्ता 2 री ची विद्यार्थिनी अत्यंत गुणी कु. गारवी रवी काळमेघ हिने ॲबॅकस स्पर्धेत प्रथम Rank पटकावित शाळेचा बहुमान वाढविला. ती आपल्या यशाचे श्रेय ॲबॅकस टिचर सौ.स्वाती आहाडे , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. छानवार मॅडम ‘ तसेच वर्गशिक्षिका रोशनी मून तसेच आई पल्लवी आणि बाबा तथा आजी – ओजाबाना देते. तिच्या यशाबद्दल जयभारत देशमुख, विनय शेलुरे, मंजुषा राजेंद्र ठाकरे, मंजुषा देशमुख, बाखडे, सुषमा खाडे, कल्पना खेरडे यांनी अभिनंदन मिश्रित कौतुक केलेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here