
उमेश एखंडे
बुलढाणा प्रतिंनिधी
सिंदखेड राजा तालुक्यातील ग्रामपंचायत वर्दडी बुद्रुक येथील ग्रामपंचायत सरपंच व नागरिकांची अरेरावी पक्षपात करुन नागरिकांची कुठलीच फाईलवर सही करीत नाही म्हणून गावातील काही नागरिकांनी गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन गावातील नागरिकांना विनाकारण ग्रामपंचायत इलेक्शन चां राग धरून तुम्ही आमच्या विरुद्ध पार्टीचे आहे तुमचे कोणतेच काम होऊ देणार नाही घरकुल व अन्य कोणत्याही फाईल असो यावर सह्या करत नाही म्हणून या अगोदरही बिडीओ साहेब याना लेखी तक्रार केली होती त्यावेळी गटविकास अधिकारी यांनी आश्वासन दिले होते की या नंतर कोणतेही अडचण येणार नाही परंतु सरपंच महोदय यांना काहीच फरक पडला नाही उलट नागरिकांना दादागिरीची व आरेराची भाषा वापरतात तुमच्या नी काय होईल ते करा मी तुमच्या फाईल वर सह्या करणारं नाही अशी उलट भाषा सरपंच सह सरपंच पती करतात ग्रामपंचायत सदस्य यांचे घरकुल प्रस्ताववर फोटो असले की सरपंच त्यावर सह्या करत नाही सरपंच म्हणतात लाभार्थ्यांना की आमच्या पार्टीच्या सदस्य यांचा फोटो पाहिजे किंवा माझा पाहिजे तर सही करतो नाहीतर करीत नाही असाप्रकर घडत आहे तरी हे जर थांबले नाही तर दी ०४/०३/२०२४ रोजी पंचायत समिती कार्यालय समोर उपोषण करणारं याची सर्वस्व जबाबदारी शासनाची राहील अर्जदार राधेराव सोनकांबळे, सोनाली सोनकांबळे, जगन्नाथ अटोळे, त्र्यंबक अटोळे, यांनी तक्रार केली असुन अखील भारतीय छावा संघटनेचे नेते रामेश्वर काकडे, वंचित बहुजन आघाडीचे दिलीप भाई खरात, साहेबराव साळवे, विजय साळवे, तानाजी साळवे , सारंगधर सोनकांबळे, या सह अनेक नागरिक व कार्यकर्ते उपस्थीत होते.











