संगम सागोर यांची आम आदमी पक्षाच्या चंद्रपूर वाहतूक संगठन जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती

0
71

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

चंद्रपूर: आम आदमी पक्षाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी संगम सागोर यांची वाहतूक संगठन च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. वाहतूक संगठन चे जिल्हाध्यक्ष महेंद्र ढॄमणे यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आली.
संगम सागोर हे चंद्रपूर शहरातील तरुण आणि सक्रिय कार्यकर्ते आहेत. ते गेल्या अनेक महिन्यापासून आम आदमी पक्षासाठी काम करत आहेत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांची मोठी पकड आहे. वाहतूक क्षेत्रातील समस्यांवर ते सतत आवाज उठवत असतात.

त्यांच्या नियुक्तीमुळे चंद्रपूरमधील वाहतूक संगठनाला अधिक मजबूती मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया:

संगम सागोर हे एक मेहनती आणि समर्पित कार्यकर्ते आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे वाहतूक संगठनाला नवीन ऊर्जा मिळेल. – मयूर राईकवार, जिल्हाध्यक्ष

संगम सागोर यांच्याकडे उत्तम नेतृत्वगुण आहेत. ते वाहतूक क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. -महेंद्र ढॄमणे, जिल्हाध्यक्ष, वाहतूक संगठन

मला आम आदमी पक्षाच्या वाहतूक संगठनाचे जिल्हा उपाध्यक्षपद मिळाल्याचा मला आनंद आहे. मी वाहतूक क्षेत्रातील समस्यांवर लढा देण्यासाठी आणि पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. – संगम सागोर, नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here