
परभणी प्रतिंनिधी
प्रबोधिनी न्युज
परभणी- गोर गरीब गरजू, अन्यायग्रस्त, फसवणूक ग्रस्त लोकांना “नो निषेध, नो निवेदन, फैसला ऑन द स्पॉट” माघेल त्याला न्याय या तत्वावर कार्य करणारी तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबवून गरजू लोकांना मदत करणारी महाराष्ट्रातील लोकप्रिय सामाजिक संघटना दयावान सरकार महाराष्ट्र राज्य जिल्हा परभणी च्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोरील विसावा कॉर्नर येथे खिचडी स्वरूपात भव्य अन्नदान करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले आहे. हा सामाजिक उपक्रम दयावान सरकार महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हा कार्यकारणीच्या वतीने करण्यात आला होते. यावेळी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य मराठवाडा अध्यक्ष संजय भाई गायकवाड, परभणी जिल्हाध्यक्ष रघुवीर सिंग भाई टाक, परभणी जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अंभोरे, शहराध्यक्ष रमेश घनघाव, सामाजिक कार्यकर्ते हरदीप सिंग बावरी व दयावान सरकार महाराष्ट्र राज्य चे पदाधीकारी, सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.














