प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
कल्याण- डोंबिवली रुग्णालयात ऑपरेशन च्या अगोदर पोलीस वेरिफिकेशन करणे आवश्यक असते. व ती प्रकिया पूर्ण करण्यासाठी किमान 4-5 दिवस लागत असतात त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. असाच एक प्रकार कल्याण – डोंबिवली येथे समोर आला होता. त्यामध्ये रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या नातेवाईक यांनी रुग्णाची गंभीर प्रकृती लक्षात घेऊन ऑपरेशन साठी जास्त वेळ न वाया जाण्यासाठी महाराष्ट्रातील गोर गरीब गरजू लोकांची आधारशीला “नो निषेध, नो निवेदन, फैसला ऑन द स्पॉट” मागेल त्याला न्याय या तत्वावर कार्य करणारी सर्वसमावेशक लोकप्रिय सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. संदिप निकुंभ यांच्याशी संपर्क करून कमी वेळात पोलीस वेरिफिकेशन करून देण्यासाठी मदत माघितली होती. तेंव्हा दयावान सरकार महाराष्ट्र राज्य टीम त्या रुग्णाच्या मदतीला धावून गेली. व ऑपरेशन साठी लागणारे पोलीस वेरिफिकेशन अवघ्या संबंधित पोलीस स्टेशन चे पी.एस.आय. मा.भवर साहेब व पी.एस.आय. मा. देवरे साहेब यांच्या मदतीने अवघ्या 5 ते 10 मिनिटात पोलीस वेरिफिकेशन ची प्रकिया पूर्ण करून देऊन रुग्णाचा प्राण वाचविण्यास मदत केली आहे. यावेळी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीपभाई निकुंभ यांनी पोलीस अधिकारी यांच्या कर्तव्यदक्ष व रुग्णाची गंभीर प्रकृती लक्षात घेऊन तात्काळ केलेल्या मदती बद्दल म्हणाले कि, “पोलीस प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व जणसामान्यांच्या संरक्षणासाठी दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत असतात. त्याच प्रमाणे समाजाची बांधिलकी जपत देश सेवा करत करत समाज सेवेचेही कार्य त्यांच्या हातून घडून येत असते. त्याचाच आज माझ्या विनंती ला मान देऊन व सदरील रुग्णाची प्रकृती लक्षात घेऊन पी. एस. आय. मा. देवरे साहेब व पी. एस. आय. मा. भवर साहेब यांनी तात्काळ पोलीस वेरिफिकेशन करून देऊन वर्दीतला देव माणूस दाखवून दिला आहे.” यावेळी दोन्ही पी. एस. आय. साहेबांचे दयावान सरकार महाराष्ट्र राज्य संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने आभार व अभिनंदन व्यक्त होत आहे तसेच सर्वसामान्य जनतेतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.यावेळी रुग्णाला व रुग्णाचे नातेवाईक यांना मदत मिळवून देण्यासाठी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.संदीप निकुंभ, मुख्य मार्गदर्शक मा. अरविंद सपकाळे, महाराष्ट्र महिला अध्यक्षा मा. प्रिया वैद्य, महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा. सिद्धार्थ राक्षे, महाराष्ट्र सचिव मा. नितीन इंगोले, कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष मा. डॉ.संदिप पाईकराव, कल्याण डोंबिवली शहर कार्याध्यक्ष ऍड. सुभाष अंभोरे, महाराष्ट्र युवा अध्यक्ष मा.अजय वाल्मिकी व दयावान सरकार संपूर्ण टीम चे सहकार्य लाभले आहे.

