तिसऱ्या दिवशीही बीआरएस चे वनविभागाच्या विरोधात अन्नत्याग आमरण उपोषण सुरू

0
56

श्रीकांत राजपंगे
तालुका प्रतिनिधी जीवती

चंद्रपूर :- जिवती तालुक्यातील मूलभूत मागण्यांसाठी 27 फेब्रुवारी पासून केंद्र सरकारच्या वनविभागाच्या विरोधात बीआरएस चे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. तिसरा दिवस असतांनाही अजून आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही.

जितनी तालुक्याला वनविभागातुन काढून महसूल विभागात टाकण्यात यावे, जिवती तालुक्यातील सर्व शेतक-यांना सरसकट शेतजमिनीचे पट्टे देण्यात यावे, जिवती नगर पंचायत क्षेत्रात तात्काळ घरकुल योजना देण्यात यावी, जिवती तालुक्यातील वनविभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात यावी अश्या मागण्यांसाठी केंद्रसरकारच्या वनविभागा विरोधात बीआरएस चे राजुरा विधानसभेचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणाला दिनांक 27 फेब्रुवारी 2024 पासून सुरुवात करण्यात आली आहे.
बालाजी करले,
सुभाष हजारे, नामदेव कोडापे, बालाजी आत्राम व रमेश आडे आदी आमरण उपोषनाला बसलेले आहेत.

जिवती तालुक्याच्या विविध मूलभूत मागण्यांसाठी बीआरएस ने 19 फेब्रुवारी 2024 पासून धरणे आंदोलन पुकारले होते आंदोलनाच्या आठव्या दिवशी जीवती चे तहसीलदार यांनी दखल घेत आंदोलनस्थळी भेट देत मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले परंतु वनविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या बाबी केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येत असल्याने बीआरएस ने केंद्र सरकार च्या वनविभाग विरोधात 27 फेब्रुवारी 2024 पासून अन्नत्याग आमरण उपोषण ची भूमिका घेतली.

जिवती तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या मागण्या पूर्ण होई पर्यंत अन्नत्याग उपोषण सुरू ठेवणार असल्याची भूमिका बीआरएस नेते भूषण फुसे यांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here