कचरू मानकर
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या एसएससी मार्च २०२४ परीक्षेला दि. १ मार्च २०२४ पासून सुरुवात होत आहे.
एस एस सी मार्च २०२४ परीक्षेची सुरुवात दिनांक एक मार्च २०२४ पासून होऊन ती २६ मार्च २०२४ पर्यंत चालणार आहे. परीक्षा म्हटले की विद्यार्थ्यांच्या मनावर दडपण येते परंतु या दडपणातून त्यांना आधार वाटतो तो आपल्या जवळच्या कुणाचातरी म्हणूनच प्रबोधिनी न्यूज चैनल चे तालुका प्रतिनिधी यांनी बोर्डाच्या परीक्षेचे सेंटर असलेले जनता विद्यालय धाबा या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत या क्षेत्रात येणारे किसान विद्यालय वेडगाव नवजीवन माध्यमिक शाळा गोजोली स्वामी विवेकानंद माध्यमिक शाळा किरमिरी व इंदिरा गांधी हायस्कूल चेक दरूर या सर्व विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींना प्रबोधिनी न्यूज चैनल तर्फे आज शुभेच्छा देण्यात आले आहे.

