
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
मुल तालुक्यातील मारोड़ा येथील युवा कार्यकर्ते शुभम आकुलवार, रीतिक मेश्राम यांचे समवेत असंख्य कार्यकर्ते सहित युवकांनी शनिवार दि.२ मार्च.रोजी शिवसेना (उ.बा.ठा) प्रवेश केला.
सदर पक्षप्रवेश शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे यांचे उपस्थितीत मारोड़ा येथे पार पडला.
शिवसेना प्रमुख मान.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर प्रेरित होउन तसेच पक्ष प्रमुख मान. उद्धव साहेब ठाकरे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिर्हे यांच्या उपस्थितित शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांच्या नेतृत्वात मारोड़ा येथील असंख्य युवकांनी पक्ष प्रवेश केला,यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे यांनी उपस्थित मारोड़ा चे तड़पदार युवा कार्यकर्ते शुभम आकुलवार तथा रीतिक मेश्राम आणि असंख्य युवकांच्या गळ्यात मशाल चिन्हाच दुपट्टा टाकत स्वागत केले. यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ नी गावातील असंख्य समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.त्यात प्रामुख्यांनी घरकुल धारकाना रेती उपलब्ध व्हावी करिता लवकरच जिल्हाधिकारी याना निवेदन देऊन घरकूल धारकाना रेती उपलब्ध व्हावी करिता प्रयत्न करनार असे सांगीतले.मुल शहरात मान. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेवा केंद्र जनसंपर्क कार्यालय दि.५ मार्च २०२४ ला साय.६.०० उदघाटन करुन तालुक्यातील गोरगरिबांचे प्रश्न या कर्यालातून सोडविण्यात येतील असे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.
या वेळी युवासेना तालुका प्रमुख रीतीक संगमवार,महेश चौधरी सुनील काळे,आकाश राम,छोटू आगबत्तुनवार,चेतन मुंगमोडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
रितिक मेश्राम,शुभम आकुलवार,संकल्प राशेट्टीवार, हेरम आदे, कपिल शंकदरवार, दिग्गु नेरलवर,रोहित भुपतवार, निरंजन मानकर, श्रीरंग गुरणुले, शशिकांत हणवते, स्वप्नील मानकर, सुमित मानकर, अजय वाढई, प्रतीक मांदाळे, गौरव गुरणुले, अतुल वाढई, प्रथम सोनुले, विजय खोब्रागडे,धनंजय मुपीडवार, ओम जिदगिल्लवार,हेमांस रोटावार आदी कार्यकर्ते आयोजित कार्यक्रमात प्रवेश केले. तथा गावकऱ्यांची विशेष उपस्थिती होती.














