prabodhini news logo
Home चंद्रपूर नवरगावच्या भारत विद्यालयाने पटकविला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार.

नवरगावच्या भारत विद्यालयाने पटकविला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार.

0
107

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

शाळा स्थरावर मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबाविण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी यांच्यात शाळेविषयी सकारात्मक आणि आपुलकीची भावना निर्माण होणे तसेच विद्यार्थ्यांना शिकताना प्रेरणादायी वातावरणाची निर्मिती व्हावी यासाठी हे विशेष अभिमान राबविण्यात आले होते. या अभियानात महाराष्ट्रातील संपूर्ण शाळांनी दोन भागात सहभाग घेतला होता. पहिला स्थर हा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद आणि नगर परिषद शाळा तर दुसरा स्तर हा खाजगी व्यवस्थापन शाळा असा होता. त्यात प्रत्येक स्तरावरील बक्षीसांची रक्कम स्वतंत्रपणे तालुका स्तर क्रमशः 3 लक्ष, 2 लक्ष आणि 1 लक्ष रुपये तर जिल्हा स्तरावर क्रमशः 11 लक्ष, 5 लक्ष आणि 3 लक्ष रुपये इतकी होती. या अभियानात चंद्रपूर जिल्ह्यातून सर्वप्रथम येण्याचा मान सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव च्या भारत विद्यालयाला मिळाला आहे. सदर शाळा 1950 साली स्थापन झाली असून पुढील वर्षात शाळा अमृत वर्षात पदार्पण करीत आहे. येत्या काहीच दिवसात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानाने शासकीय इतमानात प्रदान करण्यात येणार असल्याचे कळते. ग्रामीण भागात क्रमांक एकची शाळा म्हणून भारत विद्यालयाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. या यशाबद्दल भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंतराव बोरकर तथा सचिव सदानंद बोरकर, मुख्याध्यापिका सौ. शैवाली वैद्य आणि सर्व शिक्षक तथा विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here