prabodhini news logo
Home चंद्रपूर ८५ वर्षांवरील व्यक्तीं पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केंद्रावर न जाता मतदान करू शकतील:–डॉ....

८५ वर्षांवरील व्यक्तीं पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केंद्रावर न जाता मतदान करू शकतील:–डॉ. राजेश डहारे

0
74

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधी सिंदेवाही

सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथे भारतीय निवडणूक आयोग आणि राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने ‘मतदार जनजागृती आणि मतदान हक्क’ कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी राष्ट्रपिता म.गांधीजींच्या प्रतिमेला दीप-प्रज्वलन करून केली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश डहारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मतदानाचे महत्त्व सांगून ८५ वर्ष व त्यावरील वृद्ध तसेच दिव्यांग व्यक्तींना पोस्टल बॅलेट द्वारे मतदान केंद्रावर न जाता मतदान करू शकतील या करीता त्यांना १२ डी चा फार्म भरून द्यावा लागेल आणि सिटीजन व्हिजीलंस या ॲपद्वारे निवडणुकीदरम्यान होणाऱ्या बेकायदेशीर घटनांची माहिती विद्यार्थ्यांनी निवडणूक आयोगाला कशाप्रकारे द्यायची आणि त्याद्वारे निवडणूक आयोग कशाप्रकारे मतदाराशी जोडला गेला आहे याची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या मतदान हक्काची माहिती दिली. विध्यार्थी मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करतील अशी सूचना केली. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्रा. डॉ. सिद्धार्थ मदारे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थी मतदारांना लोकशाही शासन प्रणालीची माहिती देऊन संबंधित गावात मतदान जनजागृती करुन मतदान करण्याचे आव्हान केले. या कार्यक्रमात प्रा.रणदिवे, प्रा.बोरकर, प्रा.आडे, प्रा. गभणे,प्रा.राठोड,प्रा.मेश्राम उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना डॉ. नागलवाडे रा.से. यों कार्यक्रम अधिकारी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. उके यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here