prabodhini news logo
Home चंद्रपूर पुण्यनगरी पत्रकार सुनिल डेकाटे यांचा सत्कार

पुण्यनगरी पत्रकार सुनिल डेकाटे यांचा सत्कार

0
94

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

आंतरराष्ट्रीय मानव धिकार राजदुत संघटना ,ग्लोबल कौन्सील भारतीय महाक्रांती सेना व यु एन न्युज 24 सलंग्न माहिती अधिकारी पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेवा तथा इंडीया 24 न्युज यांचे सयुक्त विद्यमाने आयोजीत 5 वा वर्धापन दिन व महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्कार आणि सत्कार सोहळा कार्यक्रम नुकताच स्व जतीरामजी बर्वे सभागृह इंदिरानगर चंद्रपूर येथे पार पडला.
सदर कार्यक्रमात सामाजीक राजकीय आणि पत्रकार क्षेत्रात उलेखनिय कामगारी करण्याऱ्याचा सत्कार करण्यात आला. यात सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील रहवासी आणि पूण्यनगरी या वर्तमानपत्रात तेरा वर्षापासून काम करणारे रत्नापूर येथील पत्रकार सुनिल डेकाटे यांचा पुष्पगुच्छ व शिल्ड मान्यवरांच्या हस्ते देवून सत्कार करण्यात आला.
वरील कार्यक्रमाचे उदघाटन आमदार किशोर जोरगेवार यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवीका मुंबई जयश्रीमाई सावर्डेकर हया होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष पोलीस मित्र .डॉ कैलासदादा पठारे, जितेंद्र चोरडीया, शिल्पा बनपूरकर ,मुख्य संपादक इंडीया 24 न्युज तुळशिराम जांभुळकर, माहिती अधिकार सरचिटनिस राजेंद्र गेडाम आदी मान्यवर मंचावर होते. पाहुन्याचे हस्ते सामाजिक राजकीय आणि पत्रकार कार्यकर्त्याचा यावेळी सत्कार करण्यात आला. अगदी ग्रामीन भागातील रत्नापूर येथील दै. पूण्यनगरी पत्रकार सुनिल डेकाटे यांचाही पाहुण्याच हस्ते सत्कार झाल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here