prabodhini news logo
Home ठळक बातम्या समता बंधुता स्वतंत्रता या संवैधानिक तरतुदींची अवहेलना करणाऱ्यांच्या हाती सत्ता देऊ नका...

समता बंधुता स्वतंत्रता या संवैधानिक तरतुदींची अवहेलना करणाऱ्यांच्या हाती सत्ता देऊ नका – डॉ. नामदेव किरसान.

0
106

नागभीड प्रतिनिधि,

दि. 6 मार्च 2024 रोजी नागभीड शहरात रुख्मिणी सभागृहाच्या प्रांगणात बहुजन समाजातील नागरिकांकरिता जागतिक महिला दिनाचे औचित साधून राजे छत्रपती शिवाजी महाराज व फुले शाहू आंबेडकर यांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय प्रबोधनकार मी. वादळवारा फेम अनिरुद्ध वनकर व सुप्रसिद्ध गायिका ..तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रं ..!फेम कडूबाई खरात यांच्या शिवराय ते भिमराय या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान व डॉ. सतीश वारजूकर यांच्या सौजन्याने करण्यात आले होते.
यावेळी डॉ. किरसान यांनी यांना देशात समता बंधुता व स्वतंत्रता नको आहे त्यांच्य कडूनच संविधानाच्या जाळल्यात येतात. ज्यांच्या हाती आपण दहा वर्षापासून सत्ता दिलेली आहे त्यांच्याच प्रोत्साहनाने हे घडत आहे. प्रतिगामी प्रवृत्ती देशाला अधोगतीला नेत आहे. समाजात स्त्री-पुरुष व जाती धर्माच्या नावाने कुठलाही भेदभाव न करता सर्वांना समान संधी व समान न्याय देण्याची तरतूद असतांना त्याची अवहेलना केली जात आहे. बंधुता प्रस्तावित करण्याऐवजी जाती-धर्माच्या नावावर समाजात विष पेरून विभाजन केले जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. लोकशाही ऐवजी दडपशाहीचे धोरण अवलंबिले जात आहे. सगळीकडे भितीचे वातावरण निर्माण केले जात आहे. अशा प्रवृत्तीच्या लोकांच्या हाती सत्ता दिल्यास घातक होईल. मतदानाच्या माध्यमातूनच परिवर्तन घडवून आणता येते. करिता सत सत विवेक बुद्धीचा विचार करूनच मतदानाला सामोरे जावे असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ.सतिश वारजुकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून संपूर्ण महापुरुषांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ. अविनाश वारजुकर, सह उद्घाटक म्हणून महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ. नामदेवराव किरसान ,ओबीसी संघटक महाराष्ट्र प्रदेश धनराज मुंगले, गडचिरोली जिल्हा कांग्रेस कमिटी अध्यक्ष महिंद्र ब्राम्हणवाडे, जेष्ठ नेते पंजाबराव गावंडे,जेष्ठ नेते गोविंद भेंडारकर, जेष्ठ नेते फ्रफुल खापर्डे, अनमोल शेंडे सर, ऍड.दिगांबर गुरपूडे, प्रा. डॉ. राजेश कांबळे, प्रा. जगनाडे सर, विनोद बोरकर, खोजराम मरसकोल्हे ,गजाजन बुटके, डॉ. रवींद्र कावळे, प्रमोद चौधरी,विजय गावंडे, रमाकांत लोंधे,साईश वारजूकर,, पुरुषोत्तम बगमारे,विवेक कापसे,नैना गेडाम,नितुताई गुरपुडे, सुनिताताई डोईजड,माला मुळे,आशा गायकवाड,संपूर्ण सेलचे पुरुष /महिला /युवक कांग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here