बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज दिनांक ७/३/२०२४ रोजी किल्लारी पाटी येथे साखर कारखाना गेट पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर भव्य सत्कार करण्यात आला उद्धव ठाकरे हे सध्या लोकसभा मतदारसंघात संवाद यात्रेच्या माध्यमातून फिरत आहेत. आज दुपारी तीन वाजता किल्लारी येथे त्यांचे आगमन झाले यावेळी किल्लारी व परिसरातील अनेक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा जंगी सत्कार केला.यावेळी शिवसेना उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख संतोष सोमवंशी,शेखर चव्हाण,माजी उपसभापती किशोर जाधव, तालुका उपप्रमुख किशोर भोसले, युवासेना उपतालुका प्रमुख सचिन मोरे, संजय दंडगुले ,श्रीहरी उतके आदि सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

