prabodhini news logo
Home ठळक बातम्या करडखेल पाटी येथे मराठयाचे साखळी उपोषण सुरूच

करडखेल पाटी येथे मराठयाचे साखळी उपोषण सुरूच

0
68

उपोषणाचा नववा दिवस

बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज

मनोज जरांगे पाटील यांना वाशी येथे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सगेसोयरे अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करुन मराठ्यांना टिकणारे आरक्षण द्यावे या मागणीसाठी जरांगे पाटलांना समर्थन म्हणून उदगीर तालुक्यातील करडखेल पाटी येथे गेली ८ दिवसापासून साखळी उपोषण चालू आहे.
सरकारची दुटप्पी भूमिका, असून आंदोलकांवर गुन्हे दाखल करुन दडपशाही आणणे व शांततेत चालू असलेल्या अंदोलनावर sit चौकशी लादून मराठा समाजाचा अपमान करणाऱ्या या राज्य सरकारच्या विरोधात हा लढा चालु आहे व मराठा समाज कायम जरांगे पाटलांच्या मागे सक्षमपणे उभा आहे असे मत याठिकाणी भावना मांडण्यात आले आहे.
यावेळी विवेक जाधव, बाळराजे पवार, प्रविण जाधव, दिलीप होणाळे, नामदेव मुळे, श्रीराम बिरादार, उद्धव कंजे, प्रदीप गायकवाड, नामदेव गायकवाड, रामदास जाधव, योगेश मुळे, संतोष मोरे, वैभव ढगे. राजकुमार पवार . ज्ञानेश्वर पाटील.आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here