येजगांव येथे बचत गटाच्या महिलांनी “जागतिक महिला दिन” कार्यक्रम साजरा

0
1424

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

जागतिक महिला दिनानिमित्त प्रथमच येजगांव येथे बचत गटाच्या महिलांनी “जागतिक महिला दिन” कार्यक्रम साजरा करण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित उद्घघाटीका:- मा.संध्या गुरणूले( माजी अध्यक्षा जिल्हा परिषद चंद्रपूर.(महाराष्ट्र) तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान:- मा. मृगनयनी मारोती वाढई (अध्यक्ष- दिव्यशक्ती ग्रामसंघ येजगाव) प्रमुख पाहुणे:- मा. प्रसन्ना (केरळ), मा. आगरकर सर (केरळ), मा. भावना कुंभरे (CLF मॅनेजर), मा.विजय गुरणूले, मा. नामदेव लेनगुरे, मा. शामराव वाढई , मा. राजू कोसरे (पोलिस पाटील), मा.प्रदिपजी वाढई, मा, शिरभये (आरोग्य सेविका), मा. मालत वाढई (अंगणवाडी सेविका), मा. शितल वाढई (अं.से), शालू मोहूर्ले, वर्षा गुरणूले. ई. मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना संध्याताई गुरणूले यांनी गावातील महिलांना शासनाच्या वतीने राबिण्याबाबत येणाऱ्या विविध नवनवीन योजनेविषयी माहिती देऊन त्या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा, बाग्लादेशातील महीलांचे उदाहरण देऊन,” देशभर बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनविले जात आहे.

तसेच ‘महिलांचे व्यवहार किती पारदर्शक असतात ‘असे मोलाचे मार्गदर्शन आपल्या भाषणातून व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना मृगनयनी मारोती वाढई यांनी, गावातील महिलांनी आपल्याला “लोक काय म्हणतील.?” ही भावना बाजूला ठेवून कसल्याही प्रकारची भीती मनात निर्माण न करता, तसेच चुल आणि मुल पूरती मर्यादित न राहता,आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देऊन आपल्याला जमेल त्या क्षेत्रात उंच उंच भरारी घ्यावी, प्रगती करावी. येत्या काळात महिला या अबला नारी नव्हे तर सबला बनून जगासमोर या.! असे आपल्या भाषणातून प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिप्ती वाढई व आभार प्रदर्शन सौ.मालता मॅडम यांनी केले. तसेच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.त्यामध्ये गावातील सर्व महिलांनी कार्यक्रमात सहभागी होऊन अंगी असलेल्या सुप्त गुणाचे जसे, लावणी, नक्कल, चारोळी, गीत, एकपात्री नाटक, गोंडी नृत्य,कत्थक डान्स,भिमगित,असे विविध प्रकारचे नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आणि गावकरी मंडळीनी कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद दिला. परिसरात कार्यक्रमाची वाहवा.. चालू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here