वावर वांगणी ग्रामपंचायत मधील सरोळीपाडा जंगलात बिबट्याच्या हल्यात बैलाचा मृत्यू; २ दिवस उलटूनही पंचनामा नाही..

0
137

गणेश कलिंगडा
पालघर जिल्हा प्रतिनिधी

सध्या जव्हार तालुक्यामध्ये वाघ बिबट्या रात्री फिरण्याची नागरिकांमध्ये सतत चर्चा होत असल्याची सांगितले जात आहे .त्यातच उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने अन्नपाण्याच्या शोधात जंगली प्राण्यांचा वावर हा मानवी वस्तीकडे वाढू लागला आहे.यात अनेकदा पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहेत .शुक्रवारी रात्री जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेला वावर वांगणी ग्रामपंचायत मधील सरोळीपाडा गावानजीक जंगल परिसरात बिबट्याने एका बैलावर हल्ला करून मृत्यू झाल्याची ही घटना घडली आहे.परंतु ही घटना घडून आज २ दिवस उलटून गेले तरी सुद्धा वनविभागाने या घटनेचा पंचनामा केले नाही अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. आणि पशुपालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.गेल्या महिनाभरापासून तालुक्यातील जंगल परिसरात अनेकदा वाघ, बिबट्या सारखे हिंस्त्र प्राणी अन्नाच्या शोधात भटकत असताना गावकऱ्यांनी बघितले आहेत .दरम्यान गाय, म्हैस, शेळीसारख्या पाळीव प्राण्यांवर झडप घालून त्यांना जिवे मारणे अथवा गंभीर जखमी करणे या सारख्या प्रकार होत असल्याचे सांगितले जात आहे.यात पशुपालकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.आम्हाला ही घटना कळताच आम्ही पंचनामा करण्यासाठी वन अधिकारी यांना कळवले असता परंतु आता पर्यंत आले नाहीत तरी लवकरात लवकर पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई उपलब्ध करून देण्यात यावी. – भनसू धाकल रडे (पशुपालक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here