प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
गडचिरोली – दिनांक २९ मार्च २०२४ रोजी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि. ट्रस्ट) संस्थेच्या प्रेरणेने आयोजित राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान आणि गुणिजन गौरव महासंमेलन तसेच पुरस्कार वितरण सोहळा पुणे शहरात शाही banquet हॉलमध्ये संपन्न झाला . या सोहळ्यात डॉ.रेवती रेभनकर यांना मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आला .यांनी प्राकृतिक चिकित्सा उपचाराने आपण बरे कसे होऊ शकतो याबद्दल माहिती दिली, तसेच rherbs organic आणि डॉक्टर रेवाज ऑरगॅनिक या नावाने नैसर्गिक रित्या त्वचा व केसांसाठी ऑरगॅनिक प्रॉडक्ट अगदी शुद्ध पद्धतीने हॅन्ड मेड बनवले जातात . त्यामध्ये कुठल्याही केमिकल चा वापर होत नाही, त्यामुळे या नैसर्गिक प्रोडक्ट्समुळे भरपूर लोकांना आराम झालेला आहे, तसेच महिला सक्षमीकरण करता या काम करतात याचा असंख्य लोकांना फायदा झालेला आहे तसेच या ऑनलाइन फ्री कन्सल्टेशन देतात व प्राकृतिक आहार सांगतात आणि भरपूर महिला घरून काम करून सक्षम बनत आहेत ,तसेच सर्व महिला सक्षम आहेतच व भरपूर काही करू शकतात, फक्त त्यांनी हिमतीने काम केले पाहिजे असे त्यांनी सांगितले . सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुनिल सावंत हे या पुरस्कार सोहळा संमेलनाचे अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी नारीशक्ती सन्मान प्राप्त विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्याचे तसेच गुणिजन गौरव पुरस्कार प्राप्त मानकऱ्यांचे कौतुक केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आज स्त्रिया समोर जात आहेत ही एक अभिनंदनीय बाब आहे.
‘पुरस्कार म्हणजे गुणवत्तेला दाखविलेला नैवेद्य होय! त्यामुळे गुणवंत गुणिजनांचा सन्मान करताना संयोजक संस्थेला धन्यता वाटते!’ असे गौरवपूर्ण उद्गार संस्थेचे संस्थापक ऍड. कृष्णाजी जगदाळे म्हणाले . समारंभाला निमंत्रित विशेष पाहुणे दिलीप पाटील यांनी पुरस्कारप्राप्त गुणिजनांचे अभिनंदन करून त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. गुणिजन परिवाराचे पदाधिकारी लक्ष्मण दाते, जनार्दन कोंडविलकर, नारायण वाणी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुरस्कार प्रेरणा देतात; प्रेरणेने राष्ट्र मोठे होते!” या ब्रीदवाक्यावर कार्यरत ही संस्था राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय आणि विदेशस्तरीय पुरस्कार उपक्रम आयोजित करीत असते.

