
एक मायाळू व प्रेमळ आजी होती, तिला तीनही नातीच होत्या पहिलीचं नाव होतं आसू, दुसरीचं नाव होतं हसू, आणि तिसरीचं नाव होतं रुसू.
आजीबाई तिच्या नातींना भेटण्यासाठी खुप आतुर असायची.
कधी आसू ची आठवण काढून हसायची,कधी हसू ची आठवण काढून हसायची तर कधी रूसू ची आठवण काढून एकटीच हसायची.
आजीच्या नाती खुप लांब होत्या डोंगराच्या पलीकडे,आजी रोज त्यांना आठवायची,रोज नजरेसमोर आणायची आणि बघायची माझी आसू कशी असेल ?
माझी रुसू कशी असेल ?
माझी हसू कशी असेल ?
पण ती याची फक्त कल्पना करायची.संपूर्ण दिवस त्यांच्या आठवणीतच घालवायची.
आजीला तिच्या नातींना भेटण्याची खूप इच्छा होत असे पण काय करणार….
आजीच्या हातात पैसे नाहीत,आजी फक्त नातींकडे जाण्यासाठी पैसे कुठून येतील? याचाच विचार करीत बसायची.
पण आजीला कोणीतरी पैसे देईल या आशेने ती वाट बघायची.
पैसे आल्यावर नातींला भेटायला जाईल,एवढाच सतत विचार तीच्या मनात होता.
पण…
आजीच्या हाती कधीच पैसे आले नाहीत आजी नातींला भेटायला कधीच गेली नाही.
आजीच्या नाती आजीला दररोज फोन करून विचारायच्या आजी कधी येशील आम्हाला बघायला ?
आज नाही जमलं तर उद्या नक्की येईल,
उद्या नाही जमलं तर परवा नक्की येईल हं.
आजी काय आशा सोडत नव्हती अन् आजीच्या नाती काय आजीला बोलावल्याशिवाय राहत नव्हत्या.
पाहू आता अजून त्या देवाच्या भरोश्यावर सगळं सोडून दिलं आहे. जेव्हा केव्हा तो देव त्या आजीला तिच्या नातींला भेटायला घेऊन जाईन तेव्हा ती आजी नातींकडे भेटायला जाईल. सर्वकाही देवाच्या भरवशावर सोडून आजी नातींला भेटण्याची वाट पाहत आहे.
नातींला भेटायला जायचं एवढीच तीची इच्छा आहे.
आजी सतत म्हणत असते माझी आसू कशी असेल ?
माझी हसू कशी असेल ?
माझी रुसू कशी असेल ?
आजीला खूप वाईट वाटतंय, पण काय करणार नाईलाज आहे आजीचा.
सोनू मला माफ करा
मी तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही पण तुम्ही जिथे आहात तिथे सुखी रहा, यातंच मला समाधान आहे …
तुमची आज्जी














