वैद्यकिय अधिकारी म्हणुन डाॅ.वामन राठोड रुजू होताच हंडरगुळी येथील प्रा.आ.केंद्रास आली सुंदर कळा अन् गेली अवकळा; रुग्णांमध्ये समाधान

0
93

उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

हंडरगुळी — उदगीर शहरानंतर तालुक्यात सर्वात मोठे व गुरांच्या बाजारासाठी देशात सुप्रसिध्द असलेल्या हंडरगुळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला कायमचा वैद्यकिय अधिकारी/एम.ओ.नव्हता म्हणुन या सरकारी व गरीबांच्या दवाखाण्याला अवकळा आली होती. म्हणुन या विषयी आमच्या दैनिकात बातमीद्वारे आवाज उठविला.आणि या ठिकाणी केवळ मुकामी व कायम स्वरुपाचे डाॅक्टर नसल्यामुळे होणारी रुग्णांची गैरसोय व हेळसांड याबद्दल बातमी प्रकाशित होताच संबंधित प्रशासनाने येथे कायमस्वरुपी डाॅक्टर म्हणुन वामन राठोड यांची नेमणुक केली असुन,ते सतत मुक्कामी राहत असल्याने रुग्णांची सोय होत आहे. तसेच दवाखाण्याला आलेली वाईट अवकळा नष्ट झाली असुन परिसरास सुंदर अशी कळा आली आहे.. याची थोडक्यात माहिती अशी की, मदर पीएचसी या नावाने ओळखले जाणारे व कांही वर्षापुर्वी 5 डाॅक्टर व संपुर्ण कर्मचारीवर्ग मुख्यालयी राहत असलेल्या या दवाखाण्याकडे नंतर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसह जिल्हा व तालुका प्रशासनाचे विशेष दुर्लक्ष झाल्याने हा दवाखाना मोडकळीस आला होता.कारण येथे फक्त मलम पट्टी करुन व काळे,पांढरे व पिवळे, लाल या रंगाच्या गोळ्या व इंजेक्शन देऊन कसलेही रुग्ण रेफर केले जात होते.तसेच डाॅक्टरसह कर्मचारीवर्ग ही मुड मे आए भजे खाये.या म्हणी प्रमाणे मुड असेल तेंव्हा ये-जा करत होते.यामुळे गरीब,मजुर रुग्णांसह गरोदर मातांची मोठी गैरसोय तसेच पळापळ व्हायची.म्हणुन या ठिकाणी असलेल्या असुविधा व नसलेल्या डाॅक्टर,कर्मचारी व औषधे याबद्दल कांही दिवसापुर्वी आमच्या दैनिकात कायमस्वरुपी डाॅक्टर व कर्मचारी मुक्कामी राहत नसलेल्या या.प्रा.आ. केद्रास कायाकल्प पुरस्कार मिळाला कसा.या मथळ्याखाली जबरदस्त अशी बातमी छापुन आरोग्यखात्याचे लक्ष वेधून घेण्यात आले असता याच बातमीची दखल घेत आरोग्यखात्याने वैद्यकिय अधिकारी म्हणुन वामन सी. राठोड यांची नेमणुक केली आहे. डाॅ.वामन राठोड हे येथे रुजू झाल्या पासुन रोज 2 वेळची ओपीडी 200 ते 280 आहे.तर आयपीडी 20 ते 22 आहे.तसेच रोज 10/15 गरोदर माता iron sucrege आयराॅन सुक्रेज रूग्न व सायं 6 नंतर ते राञी-बेराञी साप,विंजू चावलेले,अपघात झालेले, विष प्यायलेले,डिलेव्हरी पेशंट्स या प्रकारचे रुग्ण हाळी व परिसरातुन येत असतात.आणि रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा असे म्हणत सतत क्वाॅर्टर मध्ये मुक्कामी राहून राञी-बेराञी रुग्णांची सेवा करत असल्याने डाॅ. वामन राठोडांच्या कामगिरीवर या भागातील गरीब,मजुर रुग्ण आणि जनता समाधान व्यक्त करित आहेत.. पुर्वी येथे डाॅक्टरच राहत नव्हते म्हनुन या परिसराला अवकळा आली होती. पण कांही दिवसापुर्वी वामन राठोड यांना आरोग्य खात्याने येथे ड्यूटीवर पाठविल्याने दवाखाना परिसराला सुंदर अशी कळा आली असुन डाॅ.हे कायमस्वरुपी मुक्कामी राहत असले तरी 1 / 2 कर्मचारी अप-डाऊन करताना दिसतात.डाॅ.वामन राठोड सारखा निष्णांत अधिकारी मुक्कामी राहून निस्वा:र्थपणे सेवा बजावत असल्याने रुग्णांच्या सतत वाढ होत आहे.म्हणुन या दवाखाण्यास पुन्हा 20 वर्षापुर्वीचे वैभव मिळवुन देणार आहे.असा विश्वास डाॅ.वामन राठोड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला आहे…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here