
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
साहित्य धारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद (छ.संभाजीनगर) महाराष्ट्र, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.डाॅ.प्रा.संघर्ष सावळे सर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
मा.शोभा वेले यांच्या साहित्य क्षेत्रातील मौल्यवान योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.
त्यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल.नेपाळ येथे मानवता पुरस्कार, आदर्श समाजसेविका पुरस्कार, रत्नागिरी येथे विश्व शांती पुरस्कार, औरंगाबाद येथे समाज भुषण पुरस्कार, दिल्ली येथे नॅशनल अवॉर्ड, कोल्हापूर येथे भीमक्रांती पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांचे सामाजिक कार्य अविरत सुरू आहे. मा.डाॅ.प्रा.संघर्ष सावळे सरांनी आपल्या अनमोल कार्याचा ठसा देश, विदेशात उमटवला आहे. “चलो बुध्द की और” हे त्यांच्या संस्थेचे ब्रिद वाक्य, आहे कारण आता जगाला बुद्धाची गरज आहे युद्धाची नाही.
सामाजिक, साहित्यिक, औद्योगिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचा या कविसंमेलनात सत्कार करण्यात येणार आहे.
अनेक दिग्गज मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
हा दैदिप्यमान सोहळा दिनांक ५ मे २०२४ रोजी औरंगाबाद (छ. संभाजीनगर) आइनस्टाइन सभागृह एमजीएम विद्यापीठ छ.संभाजीनगर येथे संपन्न होते आहे.











