लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सदलगा येथील नगरपरिषदेच्यावतीने मतदान जनजागृती अभियान रॅली संपन्न.

0
86

अण्णासाहेब कदम
सदलगा शहर प्रतिनिधी

चिकोडी तालुक्यातील सदलगा शहराच्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. हुसामा उद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती अभियान ही रॅली काढण्यात आली. चिकोडी लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेला आता नुकताच प्रारंभ झाला आहे. त्यामुळे केंद्रीय व राज्यस्तरीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मतदारांमध्ये जन जागृती अभियान व मतदानाचे महत्त्व या अभियानांतर्गत मतदारांचे प्रबोधन करण्यात येत आहे.
प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे. रॅलीत ‘वृद्ध असो की जवान अवश्य करा मतदान’, ‘आपल्या मतामुळे लोकशाहीचा होणार सन्मान अवश्य करा मतदान’ अशा घोषणा देण्यात आल्या. शहरात नगरपरिषदेच्या परिक्षेत्रातील प्रशालेच्या प्रांगणात निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला. त्यानंतर सर्वांना सामूहिक प्रतिज्ञा देण्यात आली. ही प्रतिज्ञा श्री अनिल कुमार डेक्कनवर यांनी सर्वांना दिली. अधिकारी व नगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने पदयात्रा काढून शहरातील मतदारांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी ‘आपल्या मतामुळे होणार लोकशाहीचा सन्मान अवश्य करा मतदान’ अशा विविध घोषणा देत मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. या दरम्यान शहरातील परिक्षेत्राच्या कक्षेत येणाऱ्या अनेक प्रशालेच्या ठिकाणी मतदान करण्यासंदर्भात जनजागृती म्हणून सामुदायिक शपथ घेण्यात आली. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान हे पवित्र कर्तव्य समजून आपण जबाबदारीने मतदान करण्याचा यावेळी निश्चय करण्यात आला. या उपक्रमात नगरपालिकेचे मुख्याधिकारी उसाम ऊद्दीन यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी संजू गुडे, हेल्थ इन्स्पेक्टर पी बी गर्दाळ ,कृष्णा बागडी, कुमार स्वामी, रुपेश करंगळे, अनिल कुमार डेक्कनवर. शहरातील सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या त्याचप्रमाणे आशा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्याचबरोबर विविध शासकीय विभागाचे अधिकारी व सहाय्यक कर्मचारी सलीम सनदी व अकबर सनदी या जनजागृती अभियानामध्ये सहभागी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here