कचरू मानकर
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
गोंडपिपरी तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये गावाचा विकास करणारा ग्राम रोजगार सेवक तोच सहा महिन्यापासून उपाशी आहे कारण तो मजुरांचे हजेरी पत्रक भरणे व मोजमाप पुस्तिका लिहिणे पगार झाले किंवा नाही तपासून पाहणे न झाल्यास अधिकारी किंवा ऑपरेटरला भेट देणे एव्हढे कामे करून सुद्धा कोणतेच अधिकारी ग्रामरोजगार सेवकां च्या मानधनाकडे लक्ष द्यायला तयार नाही तसेच त्याला साथ देणारे मजूर माहे डिसेंबर 2023 पासून ते मार्च 2024पर्यंत काही मजुरांचे पगार जमा झाले तर 428 मजुरांचे पगार रिजेक्ट मध्ये गेलेले आहे याला जबाबदार कोण? अधिकारी कि ऑपरेटर…? म्हणून ग्राम रोजगार सेवक तथा मजुराकडून महाराष्ट्र शासनाला विनंती आहे कि मानधन व मजुरांचे पगार लवकरात लवकर करावे. अशी नम्र विनंती आहे. आमच्यावर उपाशीची पाळी येऊ देऊ नये.

