बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज लातूर
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लाखो कोटी रुपयांची विकासकामे पार पडली आहेत. लातूर जिल्ह्याचा विकास झाला आहे. ज्याचे पूर्ण श्रेय आम्हा कोणाला नसून येथील स्थानिक जनतेचे आहे. जनतेने मागील वेळी भाजपला प्रचंड बहुमताने विजयी केले म्हणूनच देशात हा विकास घडू शकला.
तसेच भविष्यात लातूरच्या विकासासाठी मी स्वतः वचनबद्ध असल्याची ग्वाही देऊन या निवडणुकीमध्ये इतर कोणत्याही भूलथाप्पांना बळी न पडता. गोरगरीब, शेतकरी, महिला, युवक यांच्या कल्याणाचा आणि देशाच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून भाजपलाच प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी खा. अशोक चव्हाण साहेब, युवक व क्रिडा मंत्री मा.ना. संजय बनसोडे, आ.डॉ. देवरावजी होळी, माजी आ. गोविंदण्णा केंद्रे, माजी खा. रुपा पाटील निलंगेकर, भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर,अर्चना पाटील चाकूरकर, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रोहित कराड, माजी जि.प. अध्यक्ष मिलिंद लातूरे, शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, जिल्हा उपप्रमुख सुधीरजी पाटील, विनोदजी आर्य, रा.कॉ.चे व्यंकटराव बेंद्रे, पंडित धुमाळ, मनसेचे जिल्हाप्रमुख डॉ. नरसिंग भिकाणे, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस संजयजी दोरवे, जिल्हा उपाध्यक्ष शेषेरावजी ममाळे, निलंगा विधानसभा प्रभारी दगडुजी सोळुंके, तालुकाध्यक्ष कुमोदजी लोभे, काशिनाथजी गरीबे, मंगेशजी पाटील, माजी नगराध्यक्ष बाळासाहेबजी शिंगाडे, निलंगा कृ.उ.बा.स. सभापती शिवकुमारजी चिंचनसुरे, ऍड. संभाजीरावजी पाटील, ऍड जयश्रीताई पाटील आदींसह हजारोंच्या संख्येने नागरिक बंधू-भगिनी उपस्थित होते.

