prabodhini news logo
Home चंद्रपूर सत्कारामुळे सेवाव्रतीना सेवाकार्याचे बळ मिळते :- डाॅ. सतीश गोगुलवार

सत्कारामुळे सेवाव्रतीना सेवाकार्याचे बळ मिळते :- डाॅ. सतीश गोगुलवार

0
128

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

सत्कार सोहळ्यांमुळे सामाजिक सेवा करणाऱ्यांच्या कार्याला बळाची रसद मिळत असल्याचे प्रतिपादन आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे संस्थापक डाॅ. सतीश गोगुलवार यांनी केले ते गौरवसोहळ्याचे अध्यक्षस्थानी होते.लता मनोहर तुंडूरवार प्रतिष्ठान,पळसगाव (जाट) द्वारा शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कार्य करणा-या सेवा सर्वदा बहुउद्देशीय संस्था नागपूर येथील खुशाल ढाक व उषा ढाक यांना लता तुंडूरवार स्मृती प्रित्यर्थ सावित्री-रमाई पुरस्कार देउन गौरविण्यात आले. तर, डाॅ.मनोहर तुंडूरवार स्मृती प्रित्यर्थ वैद्यकीय क्षेत्रात अच्चुतम कार्य करणारे आनंदलोक हेल्थ फाउंडेशन चे डाॅ.प्रशांत कुचनकर,डाॅ.विराज गिते,डाॅ.नम्रता कपूरे यांना बा-बापू पुरस्कार देउन सन्मानीत करण्यात आले. दहा हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार प्रदानाचे हे पहिले वर्ष होते. शिक्षण आणि वैद्यकीय सेवाचा थेट प्रभाव समाजजीवनार खोलवर पडतो. समाजाचे मुख्य प्रश्न सोडविणारे क्षेत्र म्हणून या दोन्हीकडे आजही आदराने बघीतले जाते. सेवाक्षेत्राचे व्यावसायीकरण झालेले असतानांही आज सामाजिक सेवेचा वारसा जपत निरलसपणे आणि निस्वार्थ भावनेने जपत कार्य करणा-या संस्था आहेत. प्रतिकूल परिस्थितीत काम करणा-या संस्था समाजाचा आधार होत, अश्या संस्थाच्या गौरवातून कार्य करणा-यांना हुरूप मिळतो आणि सामाजिक कार्याची दिशा अधिक सुदृढ होत जाते. त्यामुळे या संस्थाचे प्रेरणादायी कार्य समाजातील चांगुलपणाला बळ देत असल्याचे डाॅ. सतीश गोगुलवार यांनी स्पष्ट केले.

सन्मान,गौरव व्हावा यादृष्टीने न बघता आपण स्विकारलेले कार्य कर्तव्य भावनेने आणि निष्ठापूर्वक करीत जावे हा विचार ठेउन आम्ही कार्याला सुरूवात केली. हे कार्य सेवाभावनेचे उत्तम कार्य म्हणून काही संस्थाना वाटते आणि ह्या संस्था कर्तव्यपूर्तीचा सन्मान करतात हे आमच्या उत्साहाला अधिक उर्जा पुरवितात. लता मनोहर तुंडूरवार या दोघांचेही कार्य त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात योगदान देणारे आणि सामाजिक अनुबंध ठेवणारे राहिले आहेत त्यांच्या निमीत्ताने मिळालेला पुरस्कार आमच्याकरीता प्रेरणादायी असल्याचे मनोगत सत्कारमुर्ती खुशाल ढाक, डाॅ. प्रशांत कुचनकर,डाॅ.विराज गिते यांनी व्यक्त केले. याप्रसंगी निवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कार्यांचा सन्मान म्हणून विशेष अतिधीच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अंगणवाडी पर्यवेक्षीका प्रिया खंडाळे, लता अलमस्त उपस्थित होते. भारत विद्यालय पळसगांव जाट येथील सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय पोशट्टीवार, सूत्रसंचालन संदीप तुंडूरवार, पाहुण्यांचा परिचय नवनीत तुंडूरवार व आभारप्रदर्शन प्रशांत तुंडूरवार यांनी केले. गौरव सोहळ्यात गावातील प्रतिष्ठित नागरिक व अंगणवाडी सेविका,मदतनीस यांची भरगच्च उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदय श्रीराम, रवी मडावी यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here