प्राचीन शिल्पातून चंद्रपूर साकारणारे संजय सबनवार…
प्रणित तोडे
शहर प्रतिनिधी, चंद्रपूर
प्रबोधिनी न्युज
चंद्रपुरात अनेक कलाकार आहेत, त्यात एक नाव संजय सबनवार यांचं सुद्धा आहे. यांनी आपल्या शिल्प आणि मातीच्या कलेतून दगडावर कोरीव काम करुन चंद्रपूरचे वैभव असलेल्या प्राचीन वास्तू शिल्प स्वरूपात साकारल्या, त्यांनी साकारलेले हे देखावे मन मोहनारे आहे. त्यांच्या विषयी माहिती मिळाल्या नंतर त्यांना भेटायची मनात एक सुप्त इच्छा होती जी आज पूर्ण झाली. श्री. संजयजी सबनवार यांची आज त्यांच्या राहत्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली. सोबतच अम्मा का टिफीन त्यांना भेट स्वरूपात दिला. यावेळी त्यांनी निर्माण केलेले उत्तम शिल्प देखील पहिले. यावरून लक्षात येते कि त्यांना चंद्रपूर च्या प्रत्येक प्राचीन शिल्पाचा दांडगा अभ्यास आहे. त्यांनी जटपूरा गेट, अंचलेश्र्वर मंदिर, परकोट, बुरुज मंदिरे दगडावर कोरीव काम करुन तयार केले आहे.जिल्ह्यात असे अनेक प्रतिभाशाली कलाकार पडद्याआड दडलेले आहे. त्यांना प्रोत्साहीत करून त्यांची कलाकृती जगापुढे आणन्यासाठी माझे प्रयत्न असणार आहे.

