एक मिस्ड काॅल द्या अण् हवा तो “गुटखा” घरपोच मिळवा.वाढवणा येथील विक्रेत्याचा नवा “फंडा”

0
135

परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

हंडरगुळी – राज्यात बंदी असलीतरीही वाढवणा {ता.उदगीर} येथील गुटखा विक्रेत्या तस्कराने एक मिस्ड काॅल करा आणि हवा तो गुटखा घरपोच मिळवा.असा नवीन फंड वाढवणा भागात वापरात आणला आहे.यामुळे हा धंदा जोमात तर अन्न व औषध सुरक्षा अधिकारी कोमात ! तसेच असे रे कसे गुटखा बंदी तुझे अन्न सुरक्षाधिका-यानी केले हसे ! असा सुर दिनदहाडे होत असलेली गुटख्याची आवक-जावक बघून वाढवण्यातील जनतेतू निघत आहे..
गुटख्यावर बंदी आणुन राज्यशासना- ने करोडो रुपयाच्या महसुलावर पाणी सोडले आहे.माञ शेजारच्या बिदर, मानकेश्वर,कमलनगर या कर्नाटक राज्यातील गावातुन चेक पोस्टवरील संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना व तसेच अन्न व औषध प्रशासन खाते, लातुरच्या अधिका-याला मंथली रोख महसुल देऊन तस्कर मंडळी आदर्श आचारसंहिता असतानाही दिनदहाडे रोज लाखोंचा गुटखा कर्नाटक राज्य ते महाराष्ट्र राज्यातील वाढवणा ता. उदगीर येथे आणतात.आणि वाढवना परिसरातील खेड्यापाड्यात विकतात अशी चर्चा पाटीवर ऐकू येत होती.
एका मिस्ड काॅलवर मिळतो गुटखा — मागच्या कांही दिवसा-
पासुन देशात आचारसंहिता लागली असल्याने जागोजागी 2 राज्यातील पोलीसांचा खडा पहारा चेक पोस्ट वर असतो.तरी पण कर्नाटकातुन विमल,रजनिगंधा,सिमला,गितांजली, राजनिवास,रत्ना 120/300 ब्लॅक बाबा, सागर, आरएमडी,या व अन्य नावांचा गुटखा व सुगंधीजर्दा सुपारी उदगीर मार्गे वाढवणा गावात हाडोळती तसेच शिरुर ताजबंद गावात येतोच कसा?इथला गुटखा आणताना चेक पोस्टवर बंदोबस्तावरील लोकं काय करतात?ते कोणत्या धूंदीत असतात यासारखे प्रश्न जनतेतून चर्चीले जात असुन, वाढवण्यातील त्या गुटखा तस्कराचा अन्न सुरक्षाधिका-याशी घनिष्ठ असा दोस्ताना असल्यानेच एका मिस्ड काॅलवर हा गुटखा तस्कर डाऊळ, लाळी, डांगेवाडी, वडगाव, शेळगाव, किनी, डोंग्रज, आदी लहान-मोठ्या गावातील हाॅटेल्स,पानटप-या, किराणा दुकाण, ढाबे यांना हवा तो गुटखा दिनदहाडे पुरवठा करतोय.
तसेच किनी, सुकणी या गावात याच वाढवण्याच्या सबडिलर्स नेमलेले
आहेत.व या सबडिलरचे पण अन्न सुरक्षाधिका-याशी घनिष्ठ अशी मैञी दोस्ताना करवुन दिल्यामुळे या ठिकाणी रेड न मारता संबंधित अन्न सुरक्षाधिकारी आपला दोस्ताना चांगल्याप्रकारे निभावतात.आणि म्हणुनच वाढवण्यातील दोस्ताना नामे धंदेवाल्याचा गुटखा सगळीकडे फेमस झाला असुन,तत्कालीन आयपीएस / सिंघम पोलीसअधिक्षक निकेतन कदम यांच्यासारखी धाडसी कारवाई करायची डेअरींग अन्न व औषध सुरक्षाअधिका-यासह इतर।कोणत्याच अधिका-यात डेअरींग नाही. म्हणुनच वाढवणा ता.उदगीर येथील दोस्ताना चा गुटखा व इतरकाळा धंदा सर्वदुर फेमस झाला आहे. तेंव्हा वाढवण्यातील गुटखा विक्री करणा-याशी असलेला दोस्ताना तोडून त्याच्यावर कारवाही करायची डेअरींग दाखविणार कोण व कधी याकडे वाढवणा व पंचक्रोशीतील जनतेचे लक्ष लागले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here