शहीद जवान व पोलिसांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाने केला वडेट्टीवारांचा निषेध.
माजी आमदार देशकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचा विराट निषेध आंदोलन
रवींद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज
ब्रह्मपुरी – ६ मे २०२४ रविवारी एका प्रेसला संबोधित करताना विजय वडेट्टीवार यांनी मुंबई येथील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झाला नसून पोलीस दलातील एका अधिकाऱ्याच्या गोळीने झाला असे बेताल वक्तव्य केले. आतंकवाद्याला पाठीशी घालून पोलीस विभागावर आरोप करत बेताल वक्तव्यामुळे व कसाब सारख्या आतंकवाद्याला ज्यांनी फासावर पोहचवल अशा ऍड. उज्वल निकम साहेबांना देशद्रोही म्हणणाऱ्या वडेट्टीवारांचा निषेध नोंदविण्यासाठी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या नेतृत्वात ब्रह्मपुरी येथे विराट निषेध मोर्चाचे आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले. ब्रह्मपुरी येथील वडेट्टीवारांच्या कार्यालयावर शाही फेकून व त्यांच्या पुतळ्याचे दहन करून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वडेट्टीवारांचा निषेध नोंदविला. सोबतच पोलीस स्टेशनला जाऊन वडेट्टीवार यांच्याविरुद्ध एफ आय आर दाखल करण्याकरिता निवेदन देण्यात आले.
ज्याची निष्ठा कुठेच पक्की नाही तो देशभक्ती आम्हाला शिकवणार काय असा सवाल ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार अतुलभाऊ देशकर यांनी केला.
२६/११/२००८ ला हा आतंकी हल्ला झाला तेव्हा पासून २०१४ पर्यंत सरकार काँग्रेसच होत. सर्व यंत्रणा काँग्रेसच्या हातात होत्या. तेव्हा वडेट्टीवार तुम्ही झोपा काढल्या का असा सवाल देखील माजी आमदार अतुलभाऊ देशकर यांनी उपस्थित केला. वडेट्टीवाराना सर्वदूर त्यांचा पराजय दिसतोय. पराजयाच्या नैराश्येतून विजय वडेंटीवार आपल्या अकलेचे तारे तोडत बेताल व्यक्त करत सुटले आहेत अशी टीका सुद्धा माजी आमदार देशकर यांनी यावेळी केली.
काँग्रेस मध्ये वरपासून खालपर्यंत असे बेताल, तथ्यहीन वक्तव्य करून समाजात संभ्रम निर्माण करणे विशिष्ट समाजाच्या वोटबँकेसाठी त्या समाजाला खूष करणे इतकाच धंदा काँग्रेसला उरला आहे अस मत व्यक्त करत माजी आमदार देशकर यांनी आपला निषेध नोंदवला.
या प्रसंगी ओबीसी आघाडीचे प्रदेश सचिव प्रा. प्रकाश बगमारे, भाजपा तालुका अध्यक्ष प्रा.अरुणजी शेंडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा सौ. रश्मीताई पेशने, भाजपा महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ. वंदनाताई शेंडे, तालुका महामंत्री तथा माजी नगरसेवक मनोज वठे, भाजप युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तनय देशकर यांनी निषेध सभेत आपला निषेध नोंदवला. या निषेध सभेचे संचालन शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष प्राचार्य सुयोग बाळबुधे यांनी केले.
ब्रह्मपुरी येथील भाजपा कार्यालयातून सुरू झालेला शेकडो कार्यकर्त्यांचा मोर्चा विजय वडेट्टीवार यांच्या कार्यालयावर धडकला. वडेट्टीवार यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर स्थानिक शिवाजी महाराज चौकात निषेध सभा घेण्यात आली व यानंतर ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन वडेट्टीवार च्या बेताल वक्तव्याची रीतसर तक्रार दाखल आली.
याप्रसंगी भाजपा ब्रह्मपुरी विधानसभा विस्तारक प्रादेशिक सर, भाजपा जिल्हा सचिव माणिक पाटील थेरकर, जिल्हा सचिव साकेत भानारकर, माजी नगरसेवक तथा शहर महामंत्री मनोज भूपाल,माजी सभापती तथा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामलाल दोनाडकर, शहर महामंत्री विक्रम कावळे,माजी जि. प सदस्य उमाजी कुथे, रामू निहाटे, शहर सचिव पवन जयस्वाल, तालुका महामंत्री ज्ञानेश्वर दिवटे, युवा मोर्चा महामंत्री अविनाश मस्के, बाजार समितीचे संचालक प्रा. यशवंत आंबोरकर, भाजपा अनुसूचित जमातीचे तालुकाध्यक्ष राजेश्वर मगरे, माजी शहर अध्यक्ष विलास खरवडे, माजी पं. स सदस्य प्रकाश ननावरे, युवा मोर्चा शहर महामंत्री स्वप्निल अलगदेवे, पंकज माकोडे, अमित रोकडे, दत्ता येरावार, प्रमोद बांगरे, ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष प्रा. अशोक सालोडकर, महामंत्री राजू भागवत सर, प्रा. जुमडे सर, प्रा. गिरी सर, तालुकाअध्यक्ष प्रेमलालजी धोटे, महामंत्री अनिल नाकतोडे, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष गोंधळे ताई, शहर अध्यक्ष वर्षाताई चौधरी, हेमलताताई नंदुरकर, सातपुते ताई, प्रसिद्धी प्रमुख प्रा. संजय लांबे, प्रा. दडमल, विनायक दुपरे, प्रमोद ढाल, महादेव नन्नावरे यांच्यासह प्रशांत वसाके, अरविंद कुंभारे, विवेक करंबेळकर, घनश्याम सूर्यवंशी, ऍड.जयप्रकाश अंडेलकर, गोपालजी कावळे, सरपंच अनिल तिजारे, सरपंच गोपाल ठाकरे, सरपंच गुरुदेव तुपट, सरपंच हेमंत ठाकरे, माजी सरपंच अभय कुथे, उपसरपंच रुपेश मैद, उपसरपंच राजकुमार कुत्तरमारे, सुनील मशाखेत्री, मदन मैंद, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

