प्रणित तोडे
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर, दि.10 मे 2024 वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मान. बाळासाहेब आंबेडकर यांचा 70 वा वाढदिवस पक्षाच्या चंद्रपूर महानगराच्या वतीने डेबू सावली वृध्दाश्रमात केक कापून तसेच फळे व धान्याचे वाटप करून अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला.
वृध्दाश्रमात वास्तव्यास असणारे सर्वात वयोवृद्ध असलेले वृध्द श्री.खडसे तसेच पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते व महानगर कार्यकारिणीतील सल्लागार सेवानिवृत्त प्राचार्य मान.पि.डब्लू.मेश्राम सर यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला. तसेच या प्रसंगी उपस्थित पक्षाचे चंद्रपूर महानगर अध्यक्ष मान.बंडू ठेंगरे, महासचिव प्रा.नितीन रामटेके, प्रवक्ता मान.रामजी जूनघरे,उपाध्यक्ष मान. लहुकुमार मरस्कोल्हे, सहसचिव मान.श्रावण गोहणे तसेच मान. तेजराज भगत ह्यांच्या हस्ते वृध्दांना फळांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रा.नितीन रामटेके यांनी बाळासाहेबांची जीवनगाथा तथा त्यांच्या कार्याची माहिती उपस्थितां समोर विषद केली.

