prabodhini news logo
Home चंद्रपूर रत्नापुर येथे भव्य कबड्डी स्पर्धाचे आयोजन

रत्नापुर येथे भव्य कबड्डी स्पर्धाचे आयोजन

0
267

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापुर येथील श्री. राजमुद्रा क्रीडा मंडळ रत्नापुर च्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा मुलांच्या खुल्या गटात होत आहेत. दि.१२/०५/२४ ते दि.१४/०५/२४ पर्यन्त रत्नापुर येथील वार्ड .क्र.५ श्री. शांती चौक मैदानावर या स्पर्धा होत असून प्रवेश स्विकारन्याची अंतिम तारीख दि. १३/०५/२४ पर्यंत आहे.मा. रमाकांत लोधे सभापती कृषी.उ.बा. समिती सिंदेवाही,व सहउदघाटक मा.नरेंद्र गहाने पोलीस पाटील रत्नापुर, यांच्या हस्ते रविवार दि.१२/०५/२४ ला सायंकाळी ४.३० वाजता या स्पर्धांचे उद्‍घाटन होत आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला मंगेश मेश्राम सदस्य ग्राम पंचायत रत्नापुर,संजय गहाने माजी त. मु. स. अध्यक्ष रत्नापुर, जगदीश गहाने, वामन झोड़े उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास २०,००० रुपये रोख व चषक द्वितीय क्रमांक येणाऱ्या संघास १५,००० रुपये रोख व चषक आणि तृतीय येणाऱ्या संघास १०,००० रुपये रोख व चषक, असे बक्षीस देण्यात येणार आहे.
या भव्य कबड्डी स्पर्धेला बहुसंख्य संघाने भाग घ्यावे.. असे आवाहन श्री. राजमुद्रा क्रीड़ा मंडळ च्या आयोजकांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here