पहिल्यांदा घुग्घुस मध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचा केक कापुन केला वाढदिवस साजरा

0
102

घुग्घुस प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

आज दिनांक 10 मे 2024 रोजी वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर जिल्हा प्रभारी राजेश बोरकर, जिल्हाध्यक्ष सोमाजी गोंडाने, तालुका निरिक्षक भगीरथ वाकडे, तालुकाध्यक्ष धर्मेंद्र शेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली वंचीत बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वात घुग्घुस येथे पहिल्यांदा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवसाचे बॅनर लावून 70 वा वाढदिवस केक कापुन साजरा करण्यात आला. वाढदिवसा निमित्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना आघामी लोकसभा निवडणुकीमध्ये भरघोस मताने बाळासाहेब निवडुण येतील बाळासाहेब विजयी हो व वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद चे नारे लावुन वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळेस वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव, उपाध्यक्ष जगदीश मारबते, दत्ता वाघमारे, योगेश नगराळे, अशोक भगत आशिष परेकर बबन वाघमारे नकुल निमसटकर रिता देशकर शारदा झाडे वैशाली भालशंकर स्मिता कांबळे नैना किन्नाके माधुरी चनुरवार माला जिवने, बबिता दुर्योधन, व समस्त वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here