प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगर. डॉ.संघर्ष सावळे आयोजित चलो बुध्द की ओर अंतर्गत ‘तपस्वी बुद्ध’ या विषयावर राज्यस्तरीय कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटात एमजीएम आईन्स्टाईन हॉल छ.संभाजीनगर येथे संपन्न झाला. कवी संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून वैशाली गायकवाड खंडारे अध्यक्ष विश्वसत्य फाउंडेशन छत्रपती संभाजी नगर यांची उपस्थिती लाभली. प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक कवी दडलेला असून आपल्या मनातील सुप्त भाव भावनांचा अविष्कार तो कागदावर उतरवत असतो. कवी मध्ये जग बदलण्याची प्रचंड ताकद असते.असे प्रतिपादन त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. तसेच “नको मोह,माया, नश्वर काया, ध्यानी आलय खास, धरली ग बाई पंचशीलाची मी कास…” ही स्वलिखित कविता त्यांनी गेय स्वरूपात सादर केली. डॉ. अँड्. विजयकुमार कस्तुरे चिखली अध्यक्षस्थानी होते. कस्तुरे सरांचे अध्यक्षीय भाषण अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शक ठरतील असे होते. डॉ. तसलीमा पटेल मॅडम छ. संभाजीनगर त्यांनी आपल्या मनोगतात संविधानामुळे व शिक्षणामुळे आज मी इथे उभी आहे.हे उद्गार काढून सावित्रीमाई फुले महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली. प्रा. डॉ.किशोर वाघ यांनी प्रबोधनपर गीत सादर केले. प्रा. डॉ. सुनीता कावळे मॅडम चाळीसगाव यांनी तथागत बुद्धांची तत्त्वप्रणाली आपल्या मनोगतातून मांडली. डॉ. मधुकर दिवेकर यांनी पाण्यापासून झालेला क्रांतीचा प्रारंभ आपल्या मनोगत व्यक्त केला. कार्यक्रमाची सुरुवात पूज्य भंतेजी डॉ. चंद्रबोधी यांनी बुद्ध वंदना,पंचशील घेऊन वातावरण मंगलमय केले. श्रवणीय सुर असलेली गोड गळ्याची गायिका निशिगंधा मानवतकर मंठा यांनी स्वागत गीत सादर केले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन आपल्या ओघळत्या शब्दांना उत्कृष्टपणे हाताळत प्रा. संदीप ढाकणे सर यांनी करून वातावरणात उत्साह निर्माण केला.
राज्यस्तरीय सोहळ्याचे शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करून आयोजक डॉ. संघर्ष सावळे सरांनी अथक परिश्रमाने कार्यक्रम यशस्वी केला…..

