एफ.डी.ए.चा “विठुराया” गप्प असल्यानेच कमलनगर ते उदगीर ते शिरुर ताजबंद व्हाया अहमदपुर येथे गुटखा वाहतूक व विक्री जोमात; प्रशासन कोमात.
उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
हंडरगुळी – राज्यात बंदी असलेला विमल, रजनिगंधा, राजनिवास, गौवा, गोल्ड, नजर,ब्लॅक बाबा,रत्ना 300/120, आरएमडी, सागर आदी नावांचा गुटखा व सुंगधी जर्दा याची खेड्यापाड्यात खुल्लमखुल्लां विक्री होताना आम आदमीला दिसते. माञ संबंधित अन्न व औषध सुरक्षा FDA अधिकारी महाशयाला दिसत नाही का? तसेच सं.अन्न सुरक्षाधिकारी लातुर,यांची आर्थिक “चांदी” होते. म्हणुनच FDA अन्न व औषध खाते लातुरचा “विठुराया” या गोरख धंद्या ला मुक संमती देत असेल.अशी चर्चा जनतेतुन होत आहे. म्हणुन “असे रे कसे गुटखा बंदी ; तुझे अन्न सुरक्षा अधिका-यानीच केले हसे” असे म्हणने चुक ठरु नये.कारण या धंद्यावर कारवाहीचे अधिकार असुनही अद्याप एकदा पण संबंधीत FDA च्या अन्न सुरक्षााअधिका-यानी ह्या भागात कारवाही केल्याचे ज्ञात नाही.FDA च्या सं.अधिका-यात “दमखम” नाही. म्हणुनच कर्नाटक या पर राज्यातुन उदगीर ते वाढवणा व शिरुर ताजबंद व्हाया अहमदपुर या गावात राजरोसपणे प्रतिबंधित असलेला गुटखा,सुंगधित तंबाखु,जर्दा याची वाहतूक व विक्री करणारे वाहन,गाडी सुसाटपणे धावते ते पण उदगीर शहर मार्गे हाळी तर कधी हेर व कधी जळकोट मार्गे शिरुर ताजबंद येथे गुटखा वाहतूक व विक्री करणारी गाडी विना अडथळा जाते. तसेच शिरुरचा व अहमदपुरचा गुटखा तस्कर हा कधी नंबरची तर कधी विनानंबरच्या गाडी मधून गुटख्याची तस्करी करतो.हे सामान्य जनतेला दिसते माञ अन्नसुरक्षा अधिका-याला दिसत नाही.याचे नवल वाटते. पुर्वी सिंघम i.p.s.पोलीस अधिकारी श्री. निकेतनजी कदम हे जेवढे वर्षे लातुर जिल्ह्यात ड्यूटीवर होते.तो पर्यंत हा तस्कर गुटखा विकत नव्हता. कारण ip.s निकेतनजी कदम यांचा अवैध धंदेवाल्यांत “दरारा”च तसा होता.पण i.p.s निकेतन कदमांची बढतीवर बदली होताच पुन्हा तस्करमंडळी रोज कर्नाटकात गुटखा आणायला जाताना दिसतात.
i.p.s.बी.सी.रेड्डी व अग्रवाल यांनी लक्ष घालावे.
तत्कालीन आयपीएस निकेतन कदम यांनी अवैध धंदेवाल्यांमध्ये जो धाक, दरारा बसविला होता.अगदी तसाच धाक,दरारा विद्यमान आयपीस पोलिस अधिकारी बी.सी.रेड्डी व नवदीप अग्रवाल यांनी अनेक भागातील अवैध धंदेवाल्यांत बसविला असला तरीही या भागात या 2 i.p.s. चे अद्यापही दर्शन झालेले नाही.तेंव्हा कदम सारखा धाक बसवावा.आणी या भागात लक्ष देऊन तत्कालीन आयपीएस तथा सिंघम पो.अ. निकेतन कदम यांच्या सारखी सुपर व धडाकेबाज कामगिरी करावी.अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे..

