गरीब मजूर लोकांवरच असे अत्याचार का ? :- आप नेते सुरज शहा व त्यांचे सहभागी दिलीप कापकर
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
भद्रावती तालुक्यात आदर्श सांसद ग्रामपंचायत असलेले चंदनखेडा या गावात अजूनही लोक प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल अभावी आहे, असा आरोप आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा यांनी केला आहे. आम आदमी पार्टी चे दिलीप कापकर जी यांचा कडून सुरज शहा यांना सूचना मिळाली की सांसद आदर्श ग्रामपंचायत असलेल्या चंदनखेडा येथे खूप साऱ्या लोकांनी तीन-चार वर्षा अगोदर घरकुलाचे फॉर्म भरले असून त्यांना आतापर्यंत घरकुल प्राप्त झाले नाही. हेच चौकशी करण्याकरिता आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा व युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक हे चंदनखेडा येथील काही पीडित लोकांना भेट दिली. त्यावेळी निदर्शनात आले की, गावात खुप सार्या लोकांचे घरकुल आलेले नाही. वारंवार लोकांनी ग्रामपंचायतचे चकरा मारून सुद्धा ग्रामपंचायत आमच्याकडे लक्ष देत नाही. मोदीजी हे फक्त आपल्या भाषणात सांगतात की, दोन कोटी घरकुल आम्ही गरीब लोकांना दिलं आहे परंतु हे फक्त कागदोपत्री आहे. वास्तविकता पाहता इथे आम्हाला किरायाने राहावे लागत आहे, हे बोलून असा रोष मोदीजी विरुद्ध स्थानिक लोकांनी व्यक्त केला आहे. यावेळी स्थानिक लोकांना आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा यांनी आस्वस्थ केलं की, आपल्या घरकुल साठी ही लढाई मी तुमच्यासाठी लढणार व आपणास न्याय मिळवून देणार. यावेळी युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, शुभम भोस्कर, दिलीप कापकर, व इतर गावकरी उपस्थित होते.

