

यवतमाळ प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
नेर येथील रेणुका बिहारी लाल जैस्वाल यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन स्त्री शक्ती मंच संघटनेच्या राज्य अध्यक्षा शारदा अतुल भुयार यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेतली त्यांची यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रेणुका जैस्वाल ह्या अनेक सामाजिक संस्था मध्ये कार्यरत आहेत शिवाय कोवहिड काळात भरपूर प्रमाणात मदत केली.महिलासाठी अनेक योजना राबवल्या जाणार असुन बचत गटाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती गरजु पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. स्त्री शक्ती मंच संघटनेच्या वतीने खेडयापासून तर शहरात तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे तरी महिलांनी रेनुका जैस्वाल यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शारदा भुयार यांनी कळवले आहे.














