
तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर – दिवसेनदिवस जागतिक तापमानात भर पडत असून यापुढे त्यात वाढ होणे अपरिहार्य आहे कारण दिवसांगणिक होणारी जंगगलतोड, वन जमिनीचे होणारे शहरीकरण वाढती लोकसंख्या आणि सामान्यांचे जीवावर उठणारा विकास यासाठी वृक्ष लागवड व संगोपन गरजेचे असले तरी मरणोत्तर देहदान मृत शरीर राष्ट्रार्पण करणे वा विद्युत दाहिनीला प्रेत सोपविणे ही पर्यावरण हितासाठी उपयुक्त ठरते असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पान्हेरकर यांनी देहदान अवयवदान प्रचार कार्यक्रमात प्रतिपादन केले.
महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्याने वीज केंद्र कर्मचारी नितीन मुरली राव ह्यांनी मुंबई मेडिकल कॉलेजला ऑर्गन डोनेशन, मरणोत्तर देह राष्ट्रार्पण करणार असल्याचे करारपत्र दिल्याबद्दल त्याचे विशेष कौतुक अभिनंदन या प्रसंगी करण्यात आले.
यावेळी उपस्थिताना मिठाई, फरसाण वितरण करण्यात आले. महाराष्ट्र गीतांनी कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रम सफल करण्यासाठी देवराव कोंडेकर, पूजा चहारे, नंदा बिहाडे, राजश्री शिंदे, सीमा दुपारे ह्यांनी योगदान दिले.















