
विदर्भात नावाजलेल्या मोठ मोठ्या शहरांमध्ये मोठ मोठे विद्युत केंद्र असुन विदर्भातील नागरिकांना विजेचे दर जास्ति दराने का दिले जाते.प्रश्नं खुप महत्वाचा आहे.
रोशन शेख
चंद्रपूर प्रतिनिधी
१ एप्रिल पासून विजेचे दरात वाढ झाली असुन या महिन्याचे बिल शाॅक देणारे आहे.० ते १०० विज वापरणा-या विज ग्राहकांना ७ रु ४१ पैसे मोजावे लागणार असून १०१ ते ३०० युनिट विज वापरणा-या विज ग्राहकांना १४ रुपये ६ पैशे तर ३०१ ते ५०० युनिट विज वापरणा-या विज ग्राहकांना २० रुपये तर ५०० ते १००० विज युनिट वापरणा-या विज ग्राहकांना २५ रुपये ५१ पैशे मोजावे लागणार आहे.विज युनिट च्या नावावरती स्थिर आकार.विज आकार. वहन आकार.ईंधन समायोजन आकार.विज शुल्कं.विज विक्री कर तर दाखवतच नाही.व तशेच ईतर आकार.विद्युत केंद्र नाही ते आकार लाऊन विदर्भाच्या जनतेची लुट करित आहे.ही विदर्भाच्या जनतेची लुट नाही का.जेव्हा की विदर्भात तयार होणा-या विजेवरती पहिला अधिकार विदर्भातील जनतेचाच आहे.आधिच जनता विज युनिट चे वाढते रेट व साधारण विज मिटर च्या कारणाने त्रस्त आहे.आणि यातच महाराष्ट्र राज्य शासनाने घरोघरी स्मार्ट मिटर लावन्याचा निर्णय घेतल्याने जनतेचे कंबरडे मोडन्याची शक्यता दिसुन येत आहे.त्याचे कारण अशे की आधिच लोकांकडे साधारण विज मिटर लागले असुन विजेच्या वापरानुसार अधिक जास्त विज बिल जनतेला येऊन विज बिल जास्ति येणे ही जनतेची डोके दुखि झाली असुन विज आकारणि विज बिलाचा भुभर्णा जनतेला करावा लागत आहे. जिथे आधिच साधे मिटर लागले आहे तिथे विज वापर नुसार जास्ति विज बिल येणे हा विचार करन्या योग्यं प्रश्न आहे.
आता एक नजर घेऊया जुन्या वर्षावरती.
सन १९८५ मध्ये विजेचे प्रति युनिट दर १ रुपये २० पैशे होते.सण १९९५ मध्ये विजेचे प्रति युनिट दर २ रुपये ४० पैशे झाले.सण १९९५ मध्ये विजेचे दर ३ रुपये १० पैशे ऐवढे होते.सण.२०१० मध्ये विजेचे दर ४ रुपये ६० पैशे झाले सण २०१५ ते सण २०२० पर्यंत विजेचे दर ५ ते ६ रुपये युनिट ऐवढे झाले.आणि आज वर्ष २०२४ मध्ये विजेचे प्रति युनिट दर ७ ते ९ रुपये युनिट प्रमाणे आकारले जात आहे.हा विदर्भातील जनतेवरती हुकुमशाही पद्धतीने करन्यात आलेला अन्याय आहे.पण विचार करन्या योग्य प्रश्न हा आहे की विद्युत केंद्र आपल्याच विदर्भात असुन आपल्या विदर्भातली विज मुंबई शहराला पुरविली जात आहे.आणि आपल्याच विदर्भात विद्युत केंद्र असुन आपल्याच विदर्भातील नागरिकांना विज दर प्रति युनिट ७ ते ९ रुपये युनिट प्रमाणे लावले जात आहे आकारले जात आहे.कारण काय कारण लोकसभेत आणि विधानसभेत वाढत्या विज युनिट बद्दल विदर्भातील जनतेसाठी आवाज ऊचलणारा एकही नेता दिसत नाही.जनतेचा कुणीही वाली नाही नेता मस्त आणि जनता त्रस्त ही आजची खरि परिस्थिती आहे.आणि जनते सोबत असंच व्हायला पाहिजे.कारण जनता कुंभकरणाच्या गाढ झोपेत असुन जनतेला वाढत्या विज युनिटशी काही ही लेनं देनं नाही.कारण आम्हा सर्वांना आमच्या सर्व जनतेला फुकट चि सवय झालि आहे.कुणिही वाढत्या महागाईसाठी ओरडतांना दिसत नाही.कुणिही वाढत्या विज युनिट साठी सडकी वरती येतांना आंदोलन करतांना दिसत नाही.सगळे नागरिक एकमेकांच्या भरोषाची वाट बघत राहतात.आपल्या जनतेला या सगळ्या गोष्टी घर बसल्या मिळाल्या पाहिजे अशे जनतेचे विचार आहे.होऊद्या साल्याले २० रुपये प्रति युनिट वीज दर तरी सुद्धा आम्हि सर्व नागरिक २० रुपये प्रति युनिट दराने विज घेणार आणि वाढत्या विज युनिट चा तमाशा बघत गप्प बसणार.कारण कायं कारण सरळ आणि सोपं आहे.आम्हाला महागाईची सवय झाली आहे.बस लोकशाही मध्ये मतदान करायचं आणि महागाईने आपण स्वता:ह मरुन नेत्यांना श्रीमंत बनवायचं.लोकशाही आम्हाला याच साठी मिळाली आहे.लोकशाही म्हणजे कायं साधारण लोकं तर सोडा हो अजुनही किती तरी शिकल्या सवरल्या लोकांना लोकशाही चा खरा अर्थ अजुनही कळला नाही.जनतेला लोकतंत्र मिळाला असुन जनता लोकतंत्र म्हणजे काय हे सुद्धा विसरून गेली आहे.जनतेने लोकशाहीच्या माध्यमातुन संविधान मध्ये दिलेल्या लोकतंत्राचा वापर करणे गरजे आहे.आज जे विजेचे स्मार्ट मिटर घरो घरि लागणार आहे त्याचा फटका सर्वांना तर बसणारचं आहे पण सर्व साधारण गोर गरिब वर्ग हातावर आणुन पानावरती खाणा-या गोर गरिब कुटुंबाचे सर्वात जास्तं हाल यात होऊन जातिल हे सुद्धा तेवढंच खरं आहे.कारण ज्यांच्या कडे पैसा आहे त्यांना काहि ही फरक पडणार नाही.पण आजच्या या महागाईच्या युगात महागाईच्या काळात सर्व सामान्य गोर गरिब नागरिक बरोबर महिन्याच्या अखेरच्या दिवशी विज बिल भरणा कसा करेल हा खुप महत्वाचा प्रश्नं आहे.ज्या गोर गरिब कुटुंबाकडे महिन्याच्या अखेरच्या दिवशी विज बिल भरायसाठी पैशे राहले नाही किंवा पैशे कमि राहले तर त्याला काहिच पर्याय राहणार नाही.आणि त्याला विज बिलाचे पुर्ण पैशे भरत पर्यंत अंधारातचं रहावे लागेल.कारण कधि कुणाकडे पैशे राहते कुणाकडे पैशे राहत नाही मग अशात गोर गरिब नागरिकांनी करायचं तरी कायं.कारण लागणारे सर्व स्मार्ट विज मिटर मोबाईल सारखे प्रिपेड पद्धतिचे राहणार आहे.जसा तुमचा १ महिन्याच्या मोबाईल चा रिचार्ज संपलाकी तुमचा मोबाईल पुर्णपणे बंद पडतो.तशेच या स्मार्ट विज मिटर मध्ये आहे.आज जे आपन साधारण विज मिटरचा वापर करित आहो.त्या विज मिटरचे २ महिने जरी आपन पैशे भरलो नाही तरी सुद्धा आपले विज मिटर सुरु असुन आपली विजेची लाईट सुरु राहते.व तशेच साध्या विज मिटर मध्ये आपन २ महिने जरी पैशे भरलो नाही तर विज मिटरचे पैशे ३ महिन्यात आपन भरु शकतो ही सवलत जुन्या मिटर मध्ये आहे.आणि आता नविन लागणा-या स्मार्ट विज मिटर मध्ये जनतेला जुन्या विज मिटर सारखी सवलत आणि वेळ मिळणार नाही.हाच फरक हाच अंतर साध्या विज मिटर वं स्मार्ट विज मिटर मध्ये आहे.मग प्रश्न असा पडला की आज आपन दोन महिने विज बिलाचा भरणा केला नाही तरी सुद्धा आपल्या घरचे लाईट विज सुरू राहते.पण आता जे स्मार्ट विज मिटर लागणार आहे यात अशे काहिच होणार नसुन तुमच्या विजेचा एक महिना होत असताच महिन्याच्या एक दोन दिवसा अगोदरच किंवा महिन्याच्या अखेरच्या दिवशी विज बिल भरणा चा रिचार्ज करावे लागेल किंवा विज बिल भरावे लागेल.जर तुम्ही महिन्याच्या अखेरच्या दिवशी विज बिलाचा भरणा केला नाही तर तुमचे विज मिटर बंद होऊन तुमची विज कापल्या जाईल.जर तुमच्या कडे स्मार्ट विज मिटर लागले आणि तुम्हि त्या स्मार्ट विज मिटर चे बिल महिन्याच्या अखेर च्या दिवशी भरले नाही तर तुम्हाला अंधारात रहावे लागेल.अशा प्रकारचे स्मार्ट मिटर राहणार असुन या सर्व स्मार्ट मिटर चा बहिष्कार करा. नाहीतर तुमच्या लोकशाही ला लोकतंत्राला व तुमच्या जगन्याला काहि ही अर्थ राहणार नाही.मुक होऊन तमाशा बघुन गुलामगिरीच्या व हुकुमशाही च्या जगात जगन्या पेक्षा लोकतंत्रा मध्ये आपला आवाज बुलंद करुन आपल्या हक्काच्या प्रश्नांसाठी लढुन आपले हक्क मागण्याचा प्रयत्न करा.आज जर तुम्ही लोकतंत्रा मध्ये तुमचे प्रश्नं मांडणार नाही तर येणारि पिढी ईतिहासाच्या माध्यमातून तुम्हाला प्रश्नं विचारेल तुम्हि तुमच्या काळात केले कायं.ईतिहासाच्या पानामध्ये तुमचे नांव गुलामगिरीच्या रुपात गुलाम म्हणून लिहन्यात येन्या पेक्षा काही काम अशे करा की ईतिहासाच्या पानांमध्ये तुमचे नांव लढाऊ योद्धा संघर्ष शिल लिहले गेले पाहिजे.















Bahut acha laga chandrpur ke bare me Jankar Hume to Jayanti theater aur sauna takes yad aa gayi