prabodhini news logo
Home ठळक बातम्या उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे यांची अपीलकर्त्यास अशीही वागणूक

उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे यांची अपीलकर्त्यास अशीही वागणूक

0
136


नागपूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
हिंगणा – नागपूर ग्रामीण उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे यांच्या कार्यालयात नागपूर चे पालकमंत्री यांनी २४ एप्रिल २०१७ लां सुरेंद्र प्रधान रा. डीगडोह देवी यांनी सादर केलेल्या निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यासाठी पत्र व्यवहार केला या पत्रावर ७ वर्षात उपविभागीय अधिकारी नागपूर ग्रामीण यांनी काय कारवाई केली या बाबत माजी सरपंच संतोष कटरे यांनी माहिती अधिकारात विचारणा केली असता त्यांना जन माहिती अधिकारी यांनी विविध कालावधीत कोणतीही माहिती दिली नाही.त्यामुळे प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे यांचे कडे प्रथम अपील सादर केली.त्यावर त्यांनी ३ महिन्याने आज बुधवार २२/५/२४ रोजी सुनावणी तर घेतली परंतु अपीलकर्त्याचे काय म्हणणे आहेत त्यांना काय हवे आहेत त्यांनी का अपील दाखल केली या बाबत काहीही विचारणा न करता अपील सुनावणी आटोपली व अपील कर्त्यास आल्या पावले चालते केले. या वरून अपील कर्त्यास असे निदर्शनात येत आहेत की पालकमंत्री यांच्या पत्राची ७, वर्ष दखल घेतल्या जात नसेल तर सामान्य माणसाच्या पत्राची , तक्रारीची हे उपविभागीय अधिकारी नागपूर ग्रामीण कार्यालय व येथील आकाश अवतारे सारखे अधिकारी काय दखल घेत असेल. या वरून दिसून येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here