prabodhini news logo
Home चंद्रपूर स्व. बालाजी पाटील बोरकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

स्व. बालाजी पाटील बोरकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

0
137


कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

नवरगाव येथील भारतीय शिक्षण संस्था संचालित स्व. बालाजी पाटील बोरकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल दरवर्षीप्रमाणे यंदाही १०० टक्के लागलेला असून उत्कृष्ट निकालाची परंपरा राखली आहे. महाविद्यालयाची विद्यार्थीनी खुशी पडोळे हीने विज्ञान शाखेत ८९.५० टक्के गुण प्राप्त करित सिंदेवाही तालुक्यातून प्रथम स्थान पटकाविले आहे.

स्व. बालाजी पाटील बोरकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या यंदाच्या बारावीच्या परीक्षेत महाविद्यालयातून प्रथम स्थान खुशी पडोळे ८९.५० टक्के, द्वितीय आश्लेषा लोंढे ८९.३३ टक्के आणि तृतीय स्थान प्रज्ञा बोरकर ८४.३३, सौरभ हटवादे ८३.५०, सिध्दी जोशी हीने ८२.८३ टक्के गुण प्राप्त करित यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय आई वडील, महाविद्यालयातील प्राध्यापक यांना दिले आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत बोरकर आणि सचिव सदानंद बोरकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व शिक्षक कर्मचारी यांनी त्यांचे कौतूक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here