prabodhini news logo
Home चंद्रपूर श्रीमती इंदीरा गांधी हायस्कुल, जुनासुर्ला शाळेचा मार्च २०२४ दहावीचा निकाल १००...

श्रीमती इंदीरा गांधी हायस्कुल, जुनासुर्ला शाळेचा मार्च २०२४ दहावीचा निकाल १०० टक्के

0
128

मुल प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

योगीराज श्री. विक्तुबाबा शिक्षण संस्था, जुनासुर्ला ता.मुल जि.चंद्रपुर द्वारा संचालित श्रीमती इंदीरा गांधी हायस्कुल, जुनासुर्ला या शाळेचा मार्च २०२४ दहावीचा निकाल १०० टक्के लागला असुन, मयुर संजय दयालवार या विद्यार्थाने ८५.४० टक्के गुण मिळवुन शाळेतुन प्रथम तर तेजस्विनी अनिल उपरीकार हिने ८१.८० टक्के गुण मिळवुन द्वितीय तसेच समृध्दी गणपत शेडमाके आणि उमेश किशोर आरेवार यानी अनुक्रमे ७९.०० टक्के गुण मिळवुन तृतीय क्रमांक पटकाविला.
शाळेतील १० विद्यार्थी प्राविण्य, ९ विद्यार्थी प्रथम श्रेणी तर २ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले असुन विद्यार्थीनी शाळेच्या उज्वल निकालाची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे.
संस्थेचे अध्यक्ष सिध्दार्थ रामटेके, उपाध्यक्षा जिजाबाई रामटेके, सचिव सुधिर गोवर्धन , कोषाध्यक्ष शशिकला गोवर्धन यांनी सर्व गुणवंत विद्यार्थांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here