विदर्भ लोककलावंत संघटनेने मानले शासनाचे हृदयपूर्वक आभार
शारदा भुयार
महिला जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज, वाशिम
वाशिम : केवळ वैदर्भिय लोककलावंतासाठीच नव्हे तर, पारंपारिक लोककलेचा वारसा जपून मनोरंजनासोबत समाज प्रबोधन करणाऱ्या अख्ख्या महाराष्ट्रातील तमाम लोककलावंता करीता, महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेते असलेले हाडाचे पारंपारिक गोंधळी लोककलावंत संजय कडोळे यांच्या सक्षम व यशस्वी नेतृत्वात, तन मन धनाने अविरतपणे अहोरात्र सेवाकार्य करणाऱ्या, “विदर्भ लोककलावंत संघटनेने” गेल्या सहा सात वर्षापासून लोककलावंताच्या मानधनात वाढ करून,शासनाने अ ब क श्रेणी ठेवून लोककलावंतामध्ये मतभेद न करता,लोककलावंताना सरसकट पाच हजार रुपये मानधन देण्याची मागणी शासनाकडे सातत्याने लावून धरली होती.तसेच दि 24 जानेवारी 2024 रोजी मानधन वाढीचे मागणीसाठी ” जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे लोककलावंताचे निर्णायक ठरणारे क्रांतिकारी धरणे आंदोलनही” केले होते. तसेच सदहू आंदोलनाला संपूर्ण जिल्ह्याच्या,ग्रामिण भागातून हजारो लोककलावंतानी हजेरी लावली होती.शिवाय सर्व राजकिय पक्ष,कलावंत संघटना, स्वतः आमदार अमित झनक आमदार ॲड किरणराव सरनाईक यांचे बंधू प्राचार्य अरुणराव सरनाईक, समाज कल्याण सभापती अशोकराव डोंगरदिवे,जिल्हा परिषद सदस्या चौधरीताई, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजुभाऊ किडसे, उपाध्यक्ष अमोल लुलेकर, राष्ट्रिय कॉग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष डॉ विशाल सोमटकर, पत्रकार निलेश सोमाणी,माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया, राजिक शेख, प्रदिप वानखडे , लोकप्रिय खासदार भावनाताई गवळी यांच्या वतीने शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशालीताई येळणे, आदींनी आपला भक्कम पाठींबा देऊन आंदोलन यशस्वी करण्यास मोलाचा हातभार लावला.शिवाय विदर्भ लोककलावंत संघटनेची मागणी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,सांस्कृतिक मंत्री तथा सांस्कृतिक कार्य संचालनाल्याचे संचालक बिभिषण चवरे यांचे समोर मांडून,मानधन वाढीला मंजूरी मिळवून दिली.आणि अखेर शासनाने दि 16 मार्च 2024 च्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लोककलावंताना सरसकट मानधन वाढ करून दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात येवून लगेच शासन आदेश काढण्यात आला.आणि त्यांची अंमलबजावणी करीत शासनाने सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे ऑनलाईन पद्धतीने तमाम महाराष्ट्रातील लोककलावंताच्या खात्यात एप्रिल 2024 चे पाच हजार रुपये मानधन अखेर आज गुरुवार दि. 30 मे 2024 रोजी जमा केले आहे. त्यामुळे तमाम लोककलावंतामध्ये आज गुरुवार दि. 30 मे 2024 रोजी आनंदोत्साहाचे वातावरण असून, विदर्भ लोककलावंत संघटनेच्या निर्णायक आंदोलनाला मिळालेले हे यश असल्याचे बोलल्या जात आहे.शासनाने उदार अंतःकरणाने घेतलेल्या निर्णयाबद्दल विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस,दूसरे उपमुख्यमंत्री अजितजी पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधिर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.

