ठेकेदाराच्या हलगर्जी पणामुळे गुजरी गावात पाण्याची भीषण टंचाई

0
254

कचरू मानकर
तालुका प्रतिनिधी गोंडपिपरी
प्रबोधिनी न्युज

गोंडपिपरी तालुक्यातील चेकनांदगाव पाणी पुरवठा योजने अंतर्गत मौजा गुजरी या गावात एक महिन्यापासून पाणी पुरवठा बंद आहे. पाणी मिळत नसल्याने गुजरी वासीय त्रासून गेले. जंगलात पाण्यासाठी वणवण भटकावे लागते.ठेकेदाराशी संपर्क करून सुद्धा काही जनतेला पाणी मिळेना. शेवटी महिलांनी खाली गुंड घेऊन सकमूर च्या पाण्याच्या टाकी जवळ मोर्चा आणला. महिलांनी म्हटले कि जो पर्यंत आम्हाला पाणी मिळत नाही तो पर्यंत इथून हलणार नाही.अखेर महिलांच्या लक्षात आले कि ठेकेदाराच्या हलगर्जी पणामुळे पाणी मिळत नाही आहे. तेव्हा ठेकेदार बदलून पाहिजे, असे जनतेचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here