“संविधान वृक्ष” रोपणाने धानोरकरांचा विजयोत्सव व अजिंक्यचा वाढदिवस साजरा

0
129

दिपाली पाटिल
महिला जिल्हा उपसंपादक
चंद्रपूर

चंद्रपूर-4 जुन रोजी खासदार प्रतिभा बाळूभाऊ धानोरकर या चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातून विजयी झाल्या त्यानिमित्ताने विजयोत्सव व मागिल 27 वर्षांपासून आपला प्रत्येक जन्मदिन 5 जुन जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपणाने साजरा करणारा व ट्री बॉय म्हणून प्रसिद्ध वृक्षाईचा अजिंक्य प्रतिभा-कुशाब कायरकर चा 28 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत संविधान वृक्षाचे रोपण करीत साजरा करण्यात आला.अजिंक्यच्या अनेक वर्षांपासून सातत्याने करीत असलेल्या पर्यावरण रक्षण कार्याची तत्कालीन राष्ट्रपती डॉ.ऐ.पि.जे. अब्दुल कलाम यांनी त्याच्या 8 व 10 व्या सन 2004 व 2006 च्या वाढदिवसाला शुभेच्छा पत्र पाठवून दखल घेतली.2012 साली जेष्ठ सेवाव्रती अण्णा हजारे व 2011 साली विश्वप्रसिद्ध योगगुरू बाबा रामदेव यांनी अजिंक्य सोबत वृक्षारोपण करुन त्याला देश व मानव सेवेचा आशीर्वाद दिला.

यावर्षीचा त्याचा 28 वा वाढदिवस चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या जिल्हा क्रीडा संकुल जवळील जनसंपर्क कार्यालयातील पटांगणात अजिंक्यची लहान बहीण भुमी ने औषधीयुक्त व पर्यावरण पूरक अश्या कडुनिंब या वृक्षाचे रोपण करुन संविधान व पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. या पर्यावरण रक्षण कार्यक्रमाला जनविकास सेनेचे पप्पू देशमुख,निर्भय बनो चे प्रा.सुरेश विधाते,पांडुरंग गांवतुरे,शिक्षिका रमा देशमुख,भुमी कायरकर,तेहा तिरपुडे,दिक्षा सातपुते अजिंक्यची आई प्रतिभा व वडील वृक्षाईचे संस्थापक व इरई बचाव जनआंदोलनाचे जनक कुशाब कायरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here