
जानकीराम वाघमारे,संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्देवाही
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
सिन्देवाही तालुक्यात सिमेंट काॅंक्रिट रस्ते,घर बांधकामासह शासकीय इमारत बांधकामे सुरू आहेत.मात्र शासनाने रेती घाटांचा लिलाव केला नसल्याने विकास कामांवर परिणाम होत असून बांधकामेही ठप्प झाली आहेत.रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचेही हाल होत आहेत.अशातच चोरट्या मार्गाने बेकायदेशीर रेती आणत चढ्या दराने विक्री करणाऱ्या रेती माफियांनी शिरकाव केला आहे.पावसाळा जवळ आल्याने घर बांधकाम करणाऱ्या नागरीकांना नाईलाजाने अधिक दराने रेती खरेदी करून घर बांधकाम करावे लागत असून बांधकामापैक्षा जास्त रेती खरेदीचा जास्त पैसे लागत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले जात आहे.अवैध रेती विक्रीतून रेती माफियांना अधिक पैसे पैसे मिळत असल्याने मोकळ्या जागेवर रेतीची साठवणूक करून ठेवून असून प्रती ब्रास प्रमाणे हजारो रुपये प्रमाणे रेतीची विक्री करत आहेत.
एकेकाळी स्वस्त आणि चांगल्या दर्जाची आणी परवानाधारक मिळणारी रेती आता माफियांच्या माध्यमातून अधिक दराने खरेदी करावी लागत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांसह कंत्राटदारांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे.संबधित विभागाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देत शासनाचा महसूल बुडवून बेकायदेशीरपणे रेती विक्री करणाऱ्या रेती माफियांवर कठोर कार्यवाही करून रेती घाटांचा लिलाव करावा जेणेकरून सर्वसामान्य नागरीकांना रेती खरेदी करताना दमछाक होणार नाही अशी मागणी जाणकीराम वाघमारे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्देवाही तथा ग्रा.प सदस्य मोहाळी यांनी केली आहे.














