दिपाली पाटील
जिल्हा उपसंपादक
प्रबोधिनी न्युज नेटवर्क, चंद्रपूर
वरोरा- दिनांक ६ ते २१ या कालावधीत पंथरवाडा साजरा करायचा होता.दिनांक ८ जून २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक अतीसार पंधरवडा साजरा करण्यात आला.व्यासपीठार सौ वंदना विनोद अधिसेविका, डॉ प्रतीक दारूंडे , डॉ शेंडे होतें.डाॅ शेंडे वैद्यकीय अधिकारी यांनी प्रास्ताविक केले.डाॅ .दारूंडे वैद्यकीय अधीकारी यांनी अतिसाराचे लक्षणं,कारण यांची माहिती दिली.वंदना बरडे अधीसेवीका यांनी उपाययोजना व प्रतिबंधात्मक उपाय सांगीतले.खानपान व जिवन शैली विषयी मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन श्री जुलमे यांनी केले व आभारप्रदर्शन व्रुशाली दहेकर अप यांनी केले.कार्यक्रमासाठी वंदना बरडे लक्ष्मीकांत ताले,कुंदा मडावी,जुल्मे यांनि मेहनत घेतली.कार्यक्रमाचा रुग्ण व नातेवाईक यांनि फायदा घेतला.सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सोबतच वंदना बरडे यांनी ओ.आर.एस.पावडरचे व माहिती पत्रकाचे वाटप करुन त्याचे महत्त्व समजावून सांगितले.त्याचा प्रचार व प्रसार करण्याचें आवाहन केले.

