
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
सिंदेवाही:- तालुक्यातील गाव खेड्यात व स्थानिक शहरात सुद्धा बेरोजगारीचा महापूर वाहत आहे.मात्र काही व्यक्तींनी स्वतःचा रोजगार स्वतः निर्माण करून रोड लगतच्या जागेचा आसरा घेऊन पंचवीस वर्षांपासून दुकान थाटली होती. त्याच्या भरोवस्यावर आपल्या कुटुंबांचे उदरनिर्वाहाचा प्रपंच चालवित होते. ज्या ठिकाणी दुकान थाटली त्या ठिकाणच्या जागेच्या कराचा भरणा सुद्धा त्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून ग्राम पंचायतला केला आहे.तसेच नगर पंचायतला करत होते.मात्र कर वसुली करणाऱ्या संस्थेनी व संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी याचा जराही विचार केला नाही.उलट रोडलगत ज्यांनी स्वतः स्वतःचा रोजगार निर्माण करून आपला व्यवसाय थाटला होता.पण प्रशासनाने त्यांचे दुकानावर बुलडोजर चढवून त्यांच्या कुटुंबाची अर्थव्यवस्थेचा आधार मातीमोल करून टाकला आहे.त्यामुळे त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे.त्या व्यावसायिकांच्या कुटुंबातील अर्थव्यवस्था बिघडून सामाजिक, शैक्षणिक,कौटुंबिक,मानसिक समस्या निर्माण झाली आहे.शहराला जेवढी परिसरात सुंदरता महत्वाची आहे.तेवढीच त्या शहरातील सर्व सामान्यांच्या समस्यांचे निराकरण त्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे.सिंदेवाही शहरात आधीच रोजगार नाही पण ज्यांनी स्वतःचा रोजगार थाटून आपले कुटुंबाचे पालन पोषण करत होते.त्यांचे दुकान हटवून त्यांच्या पोटावर लात मारणे अर्थातच “पाठीवर मार पण पोटावर नको मारू ” असं म्हणणाऱ्या मजुरांच्या या मराठी म्हणीच्या विरुद्ध ठरत आहे.तसेच हे अतिक्रमण शहरात रस्ते व सुंदरता निर्माण करण्याच्या उद्देशाने हटविण्यात आले आहे असे चर्चिले जात आहे.ज्या प्रमाणे शहराला सौंदर्यीकरण व सुंदरतेची आवश्यकता आहे त्याहून अधिक शहरातील जनतेच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची संसारिक आनंददायी सुंदरता ही त्याचे मानवी हक्क आहेत.त्याचे हनन कुणीही नुसती शहराच्या सुंदरतेसाठी करणे योग्य नाही.असे तज्ञ अभ्यासकांकडून तथा विचारवंताकडून बोलल्या जात आहे.
◾ पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची गरज
“ज्यांच्या दुकानावर बुलडोजर चालवीला त्यांना पर्यायी व्यवस्था निर्माण करणे हे लोकप्रतिनिधीचे प्रथम कर्तव्य आहे.” – जनता
“अन्यायग्रस्त व्यवसायिकांनी आपल्या समस्या प्रथमतः आमच्याशी संवाद साधून कथन करायला हव्यात.त्यावर पर्यायी व्यवस्था निर्माण करता येईल.”- विजय वड्डेटीवार,विरोधी पक्षनेते महा.राज्य.
“व्यावसायिकांनी आम्हांला निवेदनातून आपल्या समस्या कळवाव्यात त्यावर योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करू”- स्वप्नील कावळे,नगराध्यक्ष,न.पं.सिंदेवाही














