prabodhini news logo
Home चंद्रपूर आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा आमदारकीच्या रिंगणात?

आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा आमदारकीच्या रिंगणात?

0
274

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

एका वृतपत्राला आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा यांनी मुलाखत देताना ही माहिती उघडकीस आली, की जर पक्ष श्रेष्ठींनी आदेश दिला तर वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्रा मधून आमदारकी लढू व जिंकू. केजरीवाल साहेबांचे विचार आज भारतात प्रत्येक घरा घरात पोहचला आहे. त्यांचे दिल्ली व पंजाब मधले कामे आज देश भरात लोकांच्या मनात रुजले आहे. त्यांचे शिक्षना वर केलेले कामे, 200 युनिट वीज बिल माफ, 20 हजार लिटर पाणी फ्री, महीलाचे बस टीकीट फ्री, एस सी, एस टी व ओबीसी यांना शिषवृत्ती, शेतकऱ्यांना 50 हजार रुपये नुकसान भरपाई व इतर अनेक कामे आज जनतेला दिसले आहे. आता जनतेला प्रश्न आले आहे की, जर हे सगळे कामे दिल्ली व पंजाब मधे होऊ शकतो तर आपल्या महाराष्ट्र मधे का नाही ? हाच विश्वास घेऊन मला वरिष्ठांनी आदेश दिला तर आमदारकी लढू आणि जिंकून दाखवू. असा विश्वास यावेळी बोलताना आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here