ब्रह्मपुरीमध्ये नेमीचंद भव्य शोरुम टाईल्स दुकानाचे उद्घाटन

0
172

माजी जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर यांच्या हस्ते रीबन कापून दुकानाचे उद्घाटन

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

ब्रम्हपुरी शहरातील ख्रिस्तानंद चौकात असलेल्या नेमीचंद ग्रॅण्ड टाईल्स शॉपचे उद्घाटन सोमवार, 10 जून रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांच्या हस्ते रिबन कापून करण्यात आले. घर आणि दुकानात वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या आकर्षक टाइल्स, फिटिंग्ज, सॅनिटरी वेअर, मार्बल आदी वस्तू रास्त दरात या दुकानात उपलब्ध आहेत.
यावेळी प्रमोद चिमुरकर म्हणाले की, ब्रम्हपुरी शहरात नेमीचंद भव्य टाईल्सचे दुकान सुरू झाल्याने स्थानिकांना जास्तीत जास्त फायदा होणार आहे. दुकानातून विविध प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. आपणास माफक किमतीत वस्तू उपलब्ध करून दिल्या जातील. याप्रसंगी प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी नेमीचंद भव्य टाईल्सचे मालक नेमीचंद टांग यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगरसेवक मनोज वटे, चहांदे, कलेश्वरजी बिलगय्या, योगेशजी मिसार, चुन्नी, नागमोती, दिलीप शर्मा, नेमिचंद टांग, ओम पाटनी, वकार खान , गिरीश बुराडे,अनुराग टांग,आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here